ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाची स्पेशल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 19:28 IST2022-11-11T19:27:56+5:302022-11-11T19:28:22+5:30

Isha Keskar And Rishi Saxena : ईशा व ऋषी दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान आता ऋषीने ईशाच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

Rishi Saxena's special post on Isha Keskar's birthday | ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाची स्पेशल पोस्ट

ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाची स्पेशल पोस्ट

‘जय मल्हार’ या मालिकेत ‘बानू’च्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar ) पाहता पाहता प्रेक्षकांची लाडकी बनली. यानंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमध्ये ‘शनाया’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचली आणि पुढे तिच्या खासगी लाईफची चर्चा सुरू झाली. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता ऋषी सक्सेना (Rishi Saxena) आणि ईशाच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या. ईशा व ऋषी दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान आता ऋषीने ईशाच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. 

ऋषी सक्सेनाने ईशासोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, हॅप्पी बर्थडे पार्टनर, प्रेम. या पोस्टवर ईशाने कमेंट केली की, थँक्य यू लव्ह. माझा सपोर्ट. या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. चाहते ईशा केसकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. 

२०१८ मध्ये, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईशासोबतचा फोटो पोस्ट करत ऋषीने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ईशा व ऋषी यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्याच भेटीत ऋषीच्या शांत स्वभावावर ईशा भाळली होती. अर्थात पहिल्या भेटीत काहीही बोलणं झालं नव्हतं. यानंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा व ऋषी यांचं बोलणं सुरू झालं आणि ईशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. पुढे मैत्री बहरली आणि एकदिवस ही मैत्री प्रेमाच्या कबुलीपर्यंत आली.

आता या प्रेमाला ५ वर्षे झाली आहेत. हे दोघे आता कधी लग्न करणार? याविषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. दोघे ही सतत एकमेकांचे रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांकडून नेहमीच पसंती मिळते. चाहते या दोघांच्या फोटोंवर भरभरुन प्रतिक्रिया आणि लाईक्स देताना दिसतात.

Web Title: Rishi Saxena's special post on Isha Keskar's birthday