बहुप्रतिक्षित रिएलिटी शो 'राइज अँड फॉल' सुरु, अरबाज पटेल ते अनाया बांगर; १५ स्पर्धकांची यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 16:15 IST2025-09-06T16:14:58+5:302025-09-06T16:15:23+5:30
शोमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांची संपूर्ण लिस्ट समोर आली आहे.

बहुप्रतिक्षित रिएलिटी शो 'राइज अँड फॉल' सुरु, अरबाज पटेल ते अनाया बांगर; १५ स्पर्धकांची यादी
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर 'राइज अँड फॉल' (Rise and Fall) हा नवा शो सुरु झाला आहे. शार्क टँक फेम अशनीर ग्रोवर या सिनेमाचं सूत्रसंचालन करत आहेत. अभिनेते, डान्सर, पत्रकार, कॉमेडियन, स्पोर्ट्सपर्सन असे १५ जण या शोमध्ये सहभागी झाले आहेत आणि एकमेकांविरोधात त्यांची स्पर्धा असणार आहे. शोमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांची संपूर्ण लिस्ट समोर आली आहे.
हा शो नक्की आहे तरी काय?
राइज अँड फॉल या शोमध्ये सर्व सदस्यांना एका अपार्टमेंटमध्ये ठेवलं आहे. काही सदस्य पहिल्या मजल्यावर, काही पेंटहाऊसमध्ये आहेत. तर काही ग्राऊंड फ्लोरवर आहेत. पेंटहाऊसवरील सदस्यांना चांगल्या सुविधा मिळतील तर ग्राऊंड फ्लोर मधील सदस्यांना आव्हानांचा सामना करावा लागेल. प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांना काही टास्क देण्यात येणार आहे. यासगळ्यात सदस्य एकमेकांशी कसं जुळवून घेणार आणि त्यांच्यात काय खटके उडणार हे पाहायला मजा येणार आहे.
शोमध्ये कोण कोण सहभागी झाले?
शोचा पहिला एपिसोड रिलीज झाला आहे. एकूण १५ जण अपार्टमेंटमध्ये आले आहेत. यामध्ये धनश्री वर्मा, पवन सिंह, अर्जुन बिजलानी, कीकू शारदा, कुब्रा सैत, आदित्य नारायण, नयनदीप रक्षित, अरबाज पटेल, आरुष भोला, आहना कुमरा, संगीता फोगाट, अनाया बांगर, बाली, आकृती नेगी आणि नूरिन शा हे स्पर्धक सहभागी झाले आहेत.