आता असा दिसतो 'गोट्या', अभिनय क्षेत्र सोडून अमेरिकेत करतो हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 09:00 AM2021-09-11T09:00:00+5:302021-09-11T09:00:00+5:30

जॉय घाणेकर हा सिनेदिग्दर्शक आणि निर्माते गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे. गिरीश घाणेकर यांनी 'प्रेम करूया खुल्लम खुल्ला', 'हेच माझे माहेर', 'गोष्ट धमाल नाम्याची' , 'राजाने वाजवला बाजा', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'नवसाचं पोर' या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.

Remember Child Actor Joy Ghanekar From Marathi Serial Gotya?, This is what he does now in America, check here | आता असा दिसतो 'गोट्या', अभिनय क्षेत्र सोडून अमेरिकेत करतो हे काम

आता असा दिसतो 'गोट्या', अभिनय क्षेत्र सोडून अमेरिकेत करतो हे काम

googlenewsNext

९० च्या दशकात छोट्या पडद्यावरील 'गोट्या' ही मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनयामुळे रसिकांचीही आडती मालिका होती. मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका तितक्याच गाजल्या होत्या. मालिकेत सर्वाधिक लोकप्रिय ठरली ती म्हणजे गोट्या ही भूमिका.


'गोट्या' मालिकेत जॉय घाणेकर या बलाकलाकाराने ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे मुळे जॉयला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती. मालिकेनंतर काही सिनेमातही तो झळकला होता. जॉय घाणेकर हा सिनेदिग्दर्शक आणि निर्माते गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे. गिरीश घाणेकर यांनी 'प्रेम करूया खुल्लम खुल्ला', 'हेच माझे माहेर', 'गोष्ट धमाल नाम्याची' , 'राजाने वाजवला बाजा', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'नवसाचं पोर' या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. 

गिरीश घाणेकर यांच्या पत्नीचे नाव मीना घाणेकर यांना ध्रुव आणि जॉय ही दोन मुलं. बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा जॉय अचानक पडद्यापासून दूर गेला. काही वर्ष अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर त्याने शिक्षणासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. आपले पूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित केले. आता गोट्या कसा दिसतो? काय करतो असे प्रश्नही तुम्हाला पडले असणार.शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा अभिनय क्षेत्रात परतला नाही. तर अभिनयाव्यतिरिक्त दुसरेच क्षेत्र करिअर म्हणून निवडले. 

जॉय अमेरिकेत एका कंपनीत प्रॉडक्ट हेड म्हणून काम करतो. जॉय आता फार हँडसमही दिसतो. जॉयचे लग्नही झाले असून त्याला एक मुलगाही आहे. अभिनयापासून तो आता दूर असला तरी त्याने साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करुन आहेत. सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटो असून त्यात त्याला ओळखणं कठीण आहे.

तसेच जॉयचा भाऊ ध्रुव घाणेकरनेही अभिनेत्री ईशिता अरुणसोबत लग्न केले आहे. ईशिता ही 'ऐका दाजिबा' गाण्यामुळे प्रकाशझोतात आली होती. ईशीता ही  गायिका ईला अरुण यांची मुलगी आहे. ईशितानेही काही सिनेमात काम केले आहे. सोशल मीडियावर ईशिताचे कुटंबासह फोटो व्हायरल होत असतात.
 

Web Title: Remember Child Actor Joy Ghanekar From Marathi Serial Gotya?, This is what he does now in America, check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.