बॉलिवूड दिवा रेखा यांनी केवळ 10 तासांच्या शूटिंगसाठी घेतले कोट्यावधीचे मानधन, रक्कम वाचून व्हाल तुम्ही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 13:24 IST2020-10-03T13:24:23+5:302020-10-03T13:24:46+5:30

रेखा यांनी आजवर १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे.रेखा आपल्या अदांची जादू छोट्या पडद्यावरही दाखवणार आहेत.

Rekha to make her TV debut with new show 'Ghum Hain Kisi Ke Pyaar Mein', Took Millions Of Fees To Shoot 10 Hours | बॉलिवूड दिवा रेखा यांनी केवळ 10 तासांच्या शूटिंगसाठी घेतले कोट्यावधीचे मानधन, रक्कम वाचून व्हाल तुम्ही थक्क

बॉलिवूड दिवा रेखा यांनी केवळ 10 तासांच्या शूटिंगसाठी घेतले कोट्यावधीचे मानधन, रक्कम वाचून व्हाल तुम्ही थक्क

सौंदर्याची राणी, दिलखेचक अदांनी घायाळ करणारी, तरूण अभिनेत्रींना लाजवेल असा उत्साह आणि दिवसागणिक चिरतरूण होणाऱ्या अभिनेत्री म्हणजे बॉलीवूड दिवा रेखा. सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. रेखा यांनी आजवर १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे.रेखा आपल्या अदांची जादू छोट्या पडद्यावरही दाखवणार आहेत.रेखा स्टार प्लस वाहिनीवरील मालिका 'गुम है किसीके प्यार में' चा भाग असणार आहे.

अलीकडेच त्यांनी मुंबईच्या वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रोमोसाठीचे शूटिंग पूर्ण केले. फक्त 10 तासांच्या या शूटसाठी त्यांनी कोट्यवधीचे मानधन घेतल्याची चर्चा आहे.या प्रोमोसाठी  रेखा यांना तब्बल दोन कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  या शोसोबत रेखा यांचे नाव जोडले गेल्याने मालिकेलाही बरीच प्रसिद्धी मिळेल आणि त्याचा फायदा नक्कीच होईल, मालिका टीआरपी वाढेल असा निर्मात्यांना विश्वास  आहे. या प्रोमोत रेखा नेहमीप्रमाणे आपल्या दिलखुश अदांजात 'गुम है किसीके प्यार मे' गाण्याचे बोल गाताना दिसत आहे. व्हिडीओत रेखा नेहमीप्रमाणे आकर्षक आणि फ्रेश वाटत आहे. रेखाच्या या शोचा प्रोमो समोर येताच रेखाचे फॅन्स आनंदात आहेत.

रेखा यांच्या घरात कोरोनाने केला होता शिरकाव, बंगला केला होता सील

रेखा यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षक कोरोनाबाधित आल्यानंतर त्यांच्या बंगल्याच्या परिसरातील अन्य चार बंगल्यांचे सुरक्षारक्षकांनाही बाधा झाली होती. या सर्वांना मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. हे सुरक्षारक्षक रोज एकमेकांना भेटत होते. यामुळे त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. तसेच रेखा यांनी कोरोना चाचणी करण्यास नकार देत घरातच क्वारंटाईन राहणे पसंत केले होते.

Web Title: Rekha to make her TV debut with new show 'Ghum Hain Kisi Ke Pyaar Mein', Took Millions Of Fees To Shoot 10 Hours

टॅग्स :Rekhaरेखा