'मन उडू उडू झालं'मधून रिना अग्रवाल जिंकतेय प्रेक्षकांचे मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 11:58 IST2021-09-07T11:57:46+5:302021-09-07T11:58:21+5:30

रिना अग्रवाल हिने 'मन उडू उडू झालं' या मालिकेत साकारेल्या सानिकाच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

Reena Agarwal wins the hearts of the audience with 'Man Udu Udu Zhalam' | 'मन उडू उडू झालं'मधून रिना अग्रवाल जिंकतेय प्रेक्षकांचे मन

'मन उडू उडू झालं'मधून रिना अग्रवाल जिंकतेय प्रेक्षकांचे मन

झी मराठी वाहिनीवर नुकतीच 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री रिना अग्रवाल पहायला मिळते आहे. तिची ही पहिलीच मराठी मालिका आहे.  या मालिकेत ती सानिका देशपांडेची भूमिका साकारते आहे. जी हृता दुर्गुळेची ऑनस्क्रीन बहीण आहे. रिनाच्या या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. रिना सोशल मीडियावर सक्रीय असून ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसतात.

रिना अग्रवाल हिने  'मन उडू उडू झालं' या मालिकेत साकारेल्या सानिकाच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेबद्दल रिना सांगते की, "‘मन उडू उडू झालं’ ही माझी पहिली मराठी मालिका त्यामुळे मला असे वाटते की मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी परत आली आहे आणि फक्त माझ्याच नव्हे तर मी जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांच्या घरी आली आहे ज्यांना मी आठवड्यातले सलग ६ दिवस भेटणार आहे आणि त्यांच्याच घरातला एक भाग बनणार आहे.


तसेच या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याबद्दल खूप ऐकले होते, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची छान संधी या निमित्ताने मला मिळाली. हृता दुर्गुळेचे काम मी पाहिले होते आणि मला तिचे काम आवडलेदेखील आहे.  हृतासोबत आणि इतर कलाकारांसोबत काम करताना खूप मजा येते असेही रीनाने यावेळी सांगितलं.


आतापर्यंत रीनाने ‘अजिंठा’ या मराठी सिनेमात आदिवासी पात्राची भूमिका साकारली, तर ‘एजंट राघव- क्राईम ब्रांच’  हिंदी मालिकेत फॉरेन्सिक डॉक्टरच्या भूमिकेत दिसली होती. इतकेच नव्हे तर ‘तलाश’ हिंदी सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसली होती. ’३१ दिवस’ या मराठी सिनेमात अंध मुलीच्या भूमिकेत ती पहायला मिळाली होती.

Web Title: Reena Agarwal wins the hearts of the audience with 'Man Udu Udu Zhalam'