'तारक मेहता' मालिकेतल्या कलाकाराचा लूक फॅन्समध्ये चर्चेचा विषय, स्टायलिश लूकने करतोय साऱ्यांना घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 20:00 IST2021-08-25T20:00:00+5:302021-08-25T20:00:00+5:30

टीव्हीचा सर्वात सुपरहिट शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आजही प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. ही एक कॉमेडी मालिका असून सर्वच वयोगटातील रसिकांना आवडते आणि त्यातले प्रत्येक पात्र घरोघरी प्रसिद्ध आहेत.

Recognise him, This handsome hunk is Tarak Mehta ka Ulta chashma's Pinku, look at his transformation | 'तारक मेहता' मालिकेतल्या कलाकाराचा लूक फॅन्समध्ये चर्चेचा विषय, स्टायलिश लूकने करतोय साऱ्यांना घायाळ

'तारक मेहता' मालिकेतल्या कलाकाराचा लूक फॅन्समध्ये चर्चेचा विषय, स्टायलिश लूकने करतोय साऱ्यांना घायाळ

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. मात्र छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे.

मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात. मात्र या मालिकांपैकी अगदी मोजक्या मालिका वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर गारुड घालतात. अशीच एक मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'.

टीव्हीचा सर्वात सुपरहिट शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आजही प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. ही एक कॉमेडी मालिका असून सर्वच वयोगटातील रसिकांना आवडते आणि त्यातले प्रत्येक पात्र घरोघरी प्रसिद्ध आहेत. पिंकूची भूमिका साकारणारा अझहर शेखही चाहत्यांचा आवडता अभिनेता बनला आहे.

 

याच मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याची चाहता वर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याचा लूक चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे.फोटोमधील आकर्षक तसंच तितकीच पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूक सध्या साऱ्यांनाच भावतो आहे. 

अभिनेता अझहर शेख अनेक वर्षांपासून मालिकेत झळकत आहे. टप्पू सेनेच्या महत्त्वाच्या पात्रांपैकी तो एक आहे. ऑनस्क्रीन दिसणारा पिंकू रिअल लाईफमध्ये फिटनेस फ्रिक आहे. वर्कआऊट करतानाचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.पिंकूची मालिकेत भूमिका छोटी असली तरी लक्षवेधून घेते.  त्याची फॅन फॉलोइंगमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पिंकू अर्थात अझहर शेखने आता त्याचा पूर्णपणे लूक बदलला आहे.

सोशल मीडियावरही बराच सक्रीय आहे. या माध्यमातून उमेश आपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो,अझहर शेखने जिममधील त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. नित्यनियमाने तो वर्कआऊट करतो. वर्कआऊटकडे जराही दुर्लक्ष तो होऊ देत नाही.त्याची पिळदार बॉडी पाहून चाहतेही भरभरून कौतुक करत आहेत. या फोटोमधील त्याची बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल असाच त्याचा लूक पाहायला मिळत आहे. 

Web Title: Recognise him, This handsome hunk is Tarak Mehta ka Ulta chashma's Pinku, look at his transformation