लॉकडाऊनमध्येच अर्चना पुरणसिंगला झाला मोठा फायदा, हे सगळं बघून स्वतःच झाली शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 16:34 IST2020-04-28T16:33:57+5:302020-04-28T16:34:48+5:30

आपल्या इंस्टा अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना अर्चनाने आपला आनंद व्यक्त केला आहे.

For This Reason Archana Puran Singh thanks fans during LockDown -SRJ | लॉकडाऊनमध्येच अर्चना पुरणसिंगला झाला मोठा फायदा, हे सगळं बघून स्वतःच झाली शॉक्ड

लॉकडाऊनमध्येच अर्चना पुरणसिंगला झाला मोठा फायदा, हे सगळं बघून स्वतःच झाली शॉक्ड


अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे.  सोशल मीडियावर बऱ्याचदा कलाकार चर्चेत येत असतात.

लॉकडाऊनदरम्यान देखील कलाकारच झळकत आहेत. अर्चना पुरणसिंगची मोलकरीण याला अपवाद ठरली आहे. तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अभिनेत्री अर्चना पुरन सिंगची मोलकरीण भाग्यश्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून अर्चना तिच्यासह मजा मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. या व्हिडीओंना तिच्या चाहत्यांकडून तुफान पसंती मिळाली.

भाग्यश्रीसह मजा मस्ती करणे हे आता अर्चनाचे क्वॉरंटाईन शेड्युअलच बनले आहे. त्यामुळेच देशात सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्री अर्चना पूरन सिंगची आज मैं उपर आसमाँ निचे अशीच तिची अवस्था झाली आहे. अर्चना लॉकडाऊनमध्ये इतकी खुश असल्याचे कारणही तसेच आहे.  

कधी नव्हे ते तिच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 5 लाखांवर गेली आहे. आपल्या इंस्टा अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना अर्चनाने आपला आनंद व्यक्त केला आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, 'आपणा सर्वांना अर्धा मिलियन (पाच लाख) वेळा सर्वांचे आभार, कधीकधी शब्दही कमी पडतात. जसे की आता...'शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अर्चना खूप आनंदात दिसली. ती म्हणाली, 'हे... 5 लाख... थँक यू इंस्टा फॅमिली सतत वाढण्यासाठी. खूप प्रेम दिल्याबद्दल आणि फॉलो केल्याबद्दल धन्यवाद. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, जेव्हा मी आपले मेसेज वाचते, तेव्हा कधीकधी मी उत्तर देऊ शकत नाही. पण मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतेय.

Web Title: For This Reason Archana Puran Singh thanks fans during LockDown -SRJ