​या कारणामुळे अनुप सोनीने क्राईम पेट्रोल कार्यक्रमाला ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 14:16 IST2018-03-24T08:46:25+5:302018-03-24T14:16:25+5:30

अनुप सोनी गेली अनेक वर्षं क्राईम पेट्रोल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याची त्याची पद्धत, जय ...

For this reason, Anup Soni threw a crame petrol program RR Ram | ​या कारणामुळे अनुप सोनीने क्राईम पेट्रोल कार्यक्रमाला ठोकला रामराम

​या कारणामुळे अनुप सोनीने क्राईम पेट्रोल कार्यक्रमाला ठोकला रामराम

ुप सोनी गेली अनेक वर्षं क्राईम पेट्रोल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याची त्याची पद्धत, जय हिंद म्हणत कार्यक्रमाचा शेवट करण्याची त्याची स्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पण आता या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. त्याने या कार्यक्रमाला नुकताच रामराम ठोकला आहे. क्राईम पेट्रोल आणि अनुप हे एक समीकरणच बनले होते. तो गेल्या आठ वर्षांपासून या कार्यक्रमाचा भाग आहे. पण इतक्या वर्षांनी त्याने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनुपने हा कार्यक्रम सोडण्यामागे एक खास कारण आहे. 
अनुप हा खूप चांगला अभिनेता असून त्याने आजवर शांती, साया, कहानी घर घर की, सीआयडी यांसारख्या अनेक कार्यक्रमात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बलिकावधू या कार्यक्रमातील त्याच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. त्याने फिजा, फुटपाथ, स्ट्राईकर, दस कहानियाँ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. पण क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात तो गेल्या अनेक वर्षांपासून व्यग्र असल्याने त्याला कोणत्या चित्रपटात अथवा मालिकेत काम करता येत नाहीये. अनुप गेल्या काही वर्षांपासून सूत्रसंचालन करत असला तरी अभिनय हेच त्याचे पहिले प्रेम आहे. त्यामुळे त्याने आता क्राईम पेट्रोल हा कार्यक्रम सोडून त्याचे सगळे लक्ष अभिनयाकडे देण्याचे ठरवले आहे.
अनुप सोनीने पुढील काही भागांचे चित्रीकरण केले असल्याने काही दिवस तरी प्रेक्षकांना त्याला या कार्यक्रमात पाहाता येणार आहे. पण तो क्राईम पेट्रोलचा भाग नसल्याने त्याच्या फॅन्सना खूप वाईट वाटणार यात काहीच शंका नाही. आता हा कार्यक्रम सोडल्यानंतर तो कोणत्या कार्यक्रमात झळकतो याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
अनुप हा क्राईम पेट्रोलचा फेस असल्याचे मानले जात होते. आता त्याच्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार आणि प्रेक्षक नव्या सूत्रसंचालकाला स्वीकारणार का हे देखील पाहाणे नक्कीच रंजक असणार आहे. 

Web Title: For this reason, Anup Soni threw a crame petrol program RR Ram