​तेजश्री प्रधान झळकणार या रिअॅलिटी शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 11:19 AM2017-10-24T11:19:19+5:302017-10-24T16:49:19+5:30

होणार सून मी या घरची या मालिकेमुळे तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली. तिच्या या मालिकेतील भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले ...

At the reality show Tejashri Pradhan will be seen | ​तेजश्री प्रधान झळकणार या रिअॅलिटी शोमध्ये

​तेजश्री प्रधान झळकणार या रिअॅलिटी शोमध्ये

googlenewsNext
णार सून मी या घरची या मालिकेमुळे तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली. तिच्या या मालिकेतील भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. प्रेक्षक आजही तिला जान्हवी या नावानेच ओळखतात. या मालिकेनंतर तिने छोट्या पडद्यावर काम न करता मोठ्या पडद्यावर काम करणे पसंत केले होते. ती सध्या काय करते या चित्रपटात अंकुश चौधरी सोबत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात प्रेक्षकांना तेजश्रीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील भूमिका ही तिच्या जान्हवी या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. तसेच या चित्रपटातील तिचा लूक देखील हटके होता. या चित्रपटातील तिच्या लूकची देखील चांगलीच चर्चा झाली होती. 
होणार सून मी या घरची या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन आता जवळजवळ वर्षं झाले आहे. त्यामुळे तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कधी झळकणार याची वाट तिचे चाहते पाहात आहेत. तिच्या चाहत्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. तेजश्री आता छोट्या पडद्यावर परतणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर एका नव्या अंदाजात प्रेक्षकांना तेजश्रीला पाहाता येणार आहे. पण तेजश्री कोणत्याही मालिकेत झळकणार नसून ती एका रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तेजश्रीच्या या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये लता मंगेशकर, किशोर कुमार यांच्या आयुष्यावर आधारित असलेली पुस्तके चाळताना ती आपल्याला दिसत आहे. त्याशिवाय या प्रोमोत गिटार सारखे सांगतिक वाद्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यावरून हा कार्यक्रम संगीताशी निगडित असल्याचे आपल्याला कळत आहे. पण या कार्यक्रमाचे नाव काय असणार तसेच या कार्यक्रमात तेजश्रीची भूमिका काय असणार आहे याविषयी तेजश्रीने मौन राखणेच पसंत केले आहे. 
तेजश्री आता प्रेक्षकांना कोणत्या कार्यक्रमात पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी तिच्या फॅन्सना नक्कीच काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे. 

Also Read : ​तेजश्री प्रधानचे पहिले प्रेम तुम्हाला माहीत आहे का?

Web Title: At the reality show Tejashri Pradhan will be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.