Ratris Khel Chale 3: अण्णा परत येतायत मग ‘शेवंता’ही येणार!, अभिनेत्री अपूर्वानं दिले संकेत; पाहा 'शेवंता'चा जबरदस्त लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:40 PM2021-03-22T16:40:42+5:302021-03-22T16:42:30+5:30

Ratris Khel Chale 3: Shevanta returns as an actress Apurva Nemlekar shares her pic : - अण्णा नाईक यांच्यासोबतच 'शेवंता' देखील परत येणार असल्याचे संकेत खुद्द 'शेवंता'नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं दिले आहेत. 

Ratris Khel Chale 3 Shevanta returns as actress apurva nemlekar shares her pic on instagram | Ratris Khel Chale 3: अण्णा परत येतायत मग ‘शेवंता’ही येणार!, अभिनेत्री अपूर्वानं दिले संकेत; पाहा 'शेवंता'चा जबरदस्त लूक!

Ratris Khel Chale 3: अण्णा परत येतायत मग ‘शेवंता’ही येणार!, अभिनेत्री अपूर्वानं दिले संकेत; पाहा 'शेवंता'चा जबरदस्त लूक!

googlenewsNext

Ratris Khel Chale 3: 'झी' मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अण्णा नाईक परत येणार' अशी जाहीरातबाजी करत या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचं जोरदार प्रमोशन देखील सुरू आहेत. त्यात आता अण्णा नाईक यांच्यासोबतच 'शेवंता' देखील परत येणार असल्याचे संकेत खुद्द 'शेवंता'नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं दिले आहेत. (Ratris Khel Chale 3 Shevanta Returns)

अपूर्वानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. थरार आणि रहस्यमय कथानकानं प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या मालिकेतील शेवतांचा लवा लूक तिनं सोशल मीडियात शेअर केला आहे. लाल रंगाची नऊवारी साडी, कपाळावर कुंकु आणि हातात हिरवा चुडा अशा रुपात उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेवंताचा लूक या मालिकेतील तिच्या भूमिकेची उत्कंठा वाढवणारा ठरतो आहे.  Ratris Khel Chale 3 :- Shevanta returns as actress Apurva Nemlekar shares her pic on instagram

कोकणातील रहस्यमय कथेची जोड आणि लोकांच्या मनावर छाप पाडून जाणाऱ्या भूमिका यांमुळे 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या दोन्ही सीझननं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. प्रेक्षकांच्या याच पसंतीनंतर आता या मालिकेचं तिसरं पर्व भेटीला येत आहे. अण्णा नाईक या पात्राचा दरारा चांगलाच गाजला. तर शेवंतानं आपल्या सौंदर्य आणि अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी हिट ठरली होती. दोघांवर सोशल मीडियात जोरदार मिम्स देखील तयार केले गेलेत. आता पुन्हा एकदा ही जोडी रहस्यमय कथेचा थरारक अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे. 
 

Web Title: Ratris Khel Chale 3 Shevanta returns as actress apurva nemlekar shares her pic on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.