'रतन का रिश्ता' शोमधून नॅशनल टीव्हीवर केला होता साखरपुडा, १० वर्षानंतर यावर रतन राजपूरतने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 12:20 IST2021-07-01T12:14:14+5:302021-07-01T12:20:33+5:30

आता दहा वर्षांनंतर रतन राजपुतने यावरुन मौन सोडले आहे. तिने म्हटले की, हा शो करण्यापूर्वी मी अनेकदा विचार केला. विचारपुर्वक केलेल्या निर्णयामुळेच मी शो स्विकारला होता.

Ratan Rajput Shocking Revelations On Her Engagement On National Tv | 'रतन का रिश्ता' शोमधून नॅशनल टीव्हीवर केला होता साखरपुडा, १० वर्षानंतर यावर रतन राजपूरतने केला धक्कादायक खुलासा

'रतन का रिश्ता' शोमधून नॅशनल टीव्हीवर केला होता साखरपुडा, १० वर्षानंतर यावर रतन राजपूरतने केला धक्कादायक खुलासा

'अगले जन्म मोहे बिटीया ही किजो' मालिकेमुळे अभिनेत्री रतन राजपुत प्रकाशझोतात आली होती. गेल्या काही वर्षांपासून रतन राजपुत अभिनयापासून दूर आहे. कोणतेच काम तिच्याकडे नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिचे पर्सनल आणि करिअरविषयीच्या काही गोष्टींचा खुलासा केला. २०१० मध्ये 'रतन का रिश्ता' या रिएलिटी शोमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

या शोमुळे तिला प्रचंड पैसा प्रसिद्धी मिळाली असली तरी प्रचंड वादातही अडकली होती. या शोच्या माध्यमातून तिने स्वतःचा खरा खुरा स्वंयवर केला होता. शोच्या कंसेप्टनुसार देश विदेशातून अनेक तरुणांनी शोमध्ये सहभाग घेतला होता.

 

शोमध्ये वेगवेगळे टास्क देण्यात यायचे त्यानुसार त्यांना रतन ज्या मुलावर फिदा होईल त्याच मुलाबरोबर तिचे स्वयंवर केले जाईल अशी या शोची संकल्पना होती. अभिनव शर्मा या तरुणासोबत तिने स्वयंवरही केले होते. पण शो संपल्यानंतर रतनने अभिनवबरोबर लग्नच केले नाही.यामुळे रतनवर वेगवेगळ्या चर्चाही झाल्या. मात्र कधीच रतनने यावर आपले स्पष्टीकरण दिले नव्हते.

आता दहा वर्षांनंतर रतन राजपुतने यावरुन मौन सोडले आहे. तिने म्हटले की, हा शो करण्यापूर्वी मी अनेकदा विचार केला. विचारपुर्वक केलेल्या निर्णयामुळेच मी शो स्विकारला होता. शो ज्या संकल्पनेवर आधारित होता त्या सगळ्या गोष्टीमला मान्य होत्या. माझ्यासाठी कोणत्याच प्रकारचे नाट्य त्या शोमध्ये नव्हते माझ्यासाठी तो खेळ मुळात नव्हताच. अभिनवबरोबर मी नॅशनल टीव्हीवर अँगेजमेंटही केली. लोकांना वाटले रतनने पब्लिसिटीसाठी केले असावे. दोन पैसे कमावण्यासाठी शो केला असे अनेक आरोप त्यावेळी केले गेले.

अभिनवसह लग्न करण्यासाठी मी एक वर्ष अभिनय क्षेत्रापासून लांबही राहिली. माझा संपूर्ण वेळ त्यालाच दिला होता. पण शेवटी आमच्या नात्याचे काही भविष्य नसल्याचे जाणवले आणि तिथेच आम्ही त्या नात्याला पूर्णविराम लावला.मला फक्त पैसाच कमवायचा होता तर मी त्याच्यासाठी माझे करिअर का सोडले असते ? आम्हीही इतरांप्रमाणे खोटं खोटं जगासमोर नाटकं केल असतं. डान्स शोमध्ये दिसलो असतो. पैसे कमवले असते. यापैकी असे आम्ही काहीही केले नाही. पण जेव्हा लोकं माझ्यावर खोटे आरोप लावतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. 

'अगले जन्म मोहे बिटीया ही किजो','दिल से दिया वचन', 'राधा की बेटीयाँ कुछ कर दिखायेगी', 'रिश्तों का मेला', 'महाभारत', 'संतोषी माँ', 'बिग बॉस 7', 'फिअर फाईल्स' या शो आणि मालिकांमध्ये झळकली होती. 

Web Title: Ratan Rajput Shocking Revelations On Her Engagement On National Tv