रसिका सुनिलच्या मनमोहक अदा, तिचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 19:08 IST2021-01-02T19:03:13+5:302021-01-02T19:08:30+5:30

रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.

Rasika Sunil Shared Photo In Black Dress | रसिका सुनिलच्या मनमोहक अदा, तिचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज पाहून व्हाल घायाळ

रसिका सुनिलच्या मनमोहक अदा, तिचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज पाहून व्हाल घायाळ

रसिका सुनिलच्या अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. काही महिन्यांपूर्वी  सोशल मीडियावरील अशाच ग्लॅमरस फोटोंची खुमासदार चर्चा रंगली होती. या प्रत्येक फोटोमध्ये रसिकांचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा रसिकांचा असाच एक ग्लॅमरस फोटो समोर आला आहे. 

रसिकांचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेला हा फोटोत  मोकळे सोडलेले केस, ब्लॅक रंगातील ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे.  सोशल मीडियावर रसिकांचे हे फोटो सध्या सा-यांसाठी आकर्षण ठरत आहेत.

 

रसिकाने असे फोटोशूट  पहिल्यांदाच केले आहे असे नाही यापूर्वीही तिच्या ब्युटी, बोल्डनेस इन ब्लॅक अंदाज कॅमे-यात कैद झाले आहेत. तिच्या या फोटोंनाही रसिकांची तितकीच पसंती मिळत आहे. तुर्तास रसिकाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होतोय. रसिका नेहमीच आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता. मात्र पुढील शिक्षणासाठी शनाया अर्थात रसिकाने ही मालिका सोडली आणि ती अमेरिकेत गेली. तिथे ती शिक्षणासोबत विविध गोष्टी करत बिझी होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रसिका पुन्हा भारतात परतली होती. त्यानंतर पुन्हा ती शनायाच्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला आली होती. 


आणखीन एका कारणामुळे ती चर्चेत आहे. नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेअर केलेल्या फोटोत तिच्यासोबत आपल्याला एक तरुण पाहायला मिळत आहे. त्यामुळे ती या मुलाला डेट करतेय का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.रसिकाने या फोटोसोबत एक इंटरेस्टिंग कॅप्शन देखील लिहिली आहे.

तिने लिहिले आहे की, दो हजार एक किस... २०२१ या नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा... २०२० हे अतिशय त्रासदायक वर्षं असलं तरी मी काही कारणांमुळे या वर्षाची नेहमीच ऋणी राहीन... या वर्षाची मी ऋणी असण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे तू... तिने या पोस्टमध्ये त्या तरुणाला टॅग केले असून त्याच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस एंजिलिसमध्ये राहातो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर त्याच्यासोबत आपल्याला रसिकाचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

Web Title: Rasika Sunil Shared Photo In Black Dress