'उतरन' फेम रश्मी देसाईचा ८ वर्षांपूर्वीच झालेला घटस्फोट, दोघांनी अद्याप केलं नाही दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 12:20 IST2024-07-18T12:19:47+5:302024-07-18T12:20:18+5:30

मालिकेतील मुख्य अभिनेता नंदिश संधूसोबत तिने लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या 4 वर्षांनंतर ते वेगळे झाले.

Rashmi Desai and Nandish Sandhu still living single life after 8 years of divorce | 'उतरन' फेम रश्मी देसाईचा ८ वर्षांपूर्वीच झालेला घटस्फोट, दोघांनी अद्याप केलं नाही दुसरं लग्न

'उतरन' फेम रश्मी देसाईचा ८ वर्षांपूर्वीच झालेला घटस्फोट, दोघांनी अद्याप केलं नाही दुसरं लग्न

'उतरन' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रश्मी देसाईने (Rashmi Desai)  टीव्ही क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'बिग बॉस' मधूनही तिची वेगळी बाजू पाहायला मिळाली होती. मात्र उतरन मालिकेची तपस्या हीच तिची ओळख कायम झाली. या मालिकेमुळे तिला तिचा लाईफ पार्टनरही मिळाला होता. मालिकेतील मुख्य अभिनेता नंदिश संधूसोबत (Nandish Sandhu) तिने लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या 4 वर्षांनंतर ते वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाची नंतर अनेक कारणं समोर आली होती.

रश्मी देसाईने करिअरमध्ये यश मिळालेलं असताना लग्न केलं होतं. मात्र नंतर तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक दोन्ही आयुष्यात वेगळीच वळणं आली. मालिका तर संपलीच पण रश्मी आणि नंदिशचा घटस्फोटही झाला. माध्यम रिपोर्ट्सनुसार, रश्मीने नंदिशवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. तसंच नंदिशची अनेक मुलींसोबत मैत्री होती जे रश्मीला अजिबात मान्य नव्हतं. तर दुसरीकडे नंदिशने रश्मीचा ओव्हर सेन्सिटिव्ह स्वभाव घटस्फोटाला कारणीभूत असल्याचं सांगितलं होतं. त्याने रश्मीला या निर्णयावर पुन्हा विचार करण्याचाही सल्ला दिला होता. त्यांनी नातं जपण्यासाठी डान्स रिएलिटी शोमध्ये सहभाग गेतला होता. मात्र तरीही त्यांचं नातं टिकलं नाहीच.

2012 मध्ये रश्मी आणि नंदिशने धामधुमीत लग्न केलं होतं. पुढे २०१६ मध्येच ते वेगळे झाले. घटस्फोटाला ८ वर्ष उलटूनही दोघांनीही अद्याप पुन्हा लग्न केलेलं नाही. मध्यंतरी नंदिश अंकिता शोरेसोबत दिसला होता. अंकिताला तो डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.

Web Title: Rashmi Desai and Nandish Sandhu still living single life after 8 years of divorce