राकेश बापटची Ex पत्नी १३ वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात? 'बाथरूम'मधील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:12 IST2026-03-18T15:11:15+5:302026-03-18T15:12:37+5:30
राकेश बापटची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री रिद्धी डोगराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

राकेश बापटची Ex पत्नी १३ वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात? 'बाथरूम'मधील व्हिडीओ व्हायरल
Riddhi Dogra : 'बिग बॉस मराठी'च्या घरात राकेश बापटला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. पहिल्या दिवसापासून तो घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. राकेश बापट हा 'बिग बॉस'च्या घरातील स्ट्राँग स्पर्धक मानला जात आहे. चाहत्यांनीही त्याला टॉप ५ मध्ये बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे त्याची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री रिद्धी डोगराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
'द ५०' या शोमध्ये रिद्धी आणि स्पर्धक सिवेत तोमर यांच्यातील वाढत्या जवळीकीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ४१ वर्षीय रिद्धी आणि २८ वर्षीय सिवेत यांच्यातील केमिस्ट्रीची सर्वत्र चर्चा आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे हे दोघेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, सिवेत आणि रिद्धी हे बाथरूममध्ये बंद असून त्यांच्यातील संवाद ऐकायला येतोय.
शोमध्ये सिवेत रिधीवर नाराज होतो आणि तो तिच्यापासून दूर राहू लागतो. सिवेतची नाराजी रिधीला सहन होत नाही. त्याची नाराजी दूर करण्यासाठी ती बाथरूममध्ये त्याला विचारते, "तू नक्की काय करतोयस? मला काहीच कळत नाहीये. तू माझ्याशी का बोलत नाहीयेस?". यावर रिद्धीने त्याला 'ओव्हरफ्रेंडली' म्हटल्याचं त्याला आवडलं नसल्याचं तो सांगतो. ज्यावर रिद्धीने ती केवळ गंमत होती, असे स्पष्टीकरण दिले.
वयातील अंतरावरून ट्रोलिंग
रिद्धी डोगरा ही ४१ वर्षांची असून तिने २०११ मध्ये अभिनेता राकेश बापट याच्याशी लग्न केले होते, मात्र २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दुसरीकडे, सिवेत तोमर हा २८ वर्षांचा असून तो 'रोडीज' आणि 'स्प्लिट्सव्हिला' फेम स्टार आहे. रिद्धी आपल्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या सिवेतच्या प्रेमात पडली आहे का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. याच शोमध्ये सिवेतने कॅमेऱ्यासमोर रिद्धीला प्रपोज केले होते. रिद्धीसुद्धा सिवेतची खूप काळजी घेताना दिसते, ज्यामुळे त्यांच्यात केवळ मैत्री नसून त्यापेक्षा काहीतरी जास्त असल्याचे बोलले जात आहे.