रॅपर बादशाह दिसणार परीक्षकाच्या खुर्चीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:30 IST2022-07-19T19:29:55+5:302022-07-19T19:30:23+5:30

एमटीव्ही हसलच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता दुसरा सीझन भेटीला येतो आहे.

Rapper Badshah will be seen in the judge's chair | रॅपर बादशाह दिसणार परीक्षकाच्या खुर्चीत

रॅपर बादशाह दिसणार परीक्षकाच्या खुर्चीत

एमटीव्ही हसलच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर फ्रेमॅन्टल मीडियाने तयार केलेला एमटीव्ही हसल २.० भेटीला येत आहे. त्याचबरोबर या शोचा दर्जा प्रचंड वाढवण्यासाठी त्याचा नवीन परीक्षक रॅपचा आंतरराष्ट्रीय राजा बादशाह यावेळी सहभागी होणार आहे. या भारतीय मेगास्टारने आपल्या अप्रतिम संगीत आणि अलीकडील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांद्वारे संपूर्ण जगात आपले स्थान निर्माण केले आहे. तो देशभरातील ताजेतवाने रॅप संगीत ऐकण्यासाठी सज्ज आहे.   

बादशाह स्पर्धकांमध्ये रॅपचे युद्ध होत असताना शोच्या नवीन सीझनचे परीक्षण करेल. या स्पर्धकांना त्यांच्या टीमच्या बॉसकडून मार्गदर्शन मिळणार आहे. हा प्रतिष्ठित रॅपर-आदर्श प्रत्येक निकषांच्या कसोटीवर स्पर्धकांची तपासणी करेल आणि देशाचे पुढील पिढीचे रॅप हिप-हॉप सेन्सेशन होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करेल. या स्पर्धकांची निवड त्यांचे लेखन, रॅपिंग टॅलेंट आणि कामगिरीनुसार केली जाईल.


एमटीव्ही हसल २.० साठी परीक्षक म्हणून काम करण्याबाबत बोलताना बादशाह म्हणाला की, जागतिक नकाशावर आपले संगीत आणण्याचे स्वप्न पाहणारा एक इंडी रॅप कलाकार म्हणून किती मेहनत करावी लागते याची मला कल्पना आहे. एमटीव्ही हसल हा एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे, जो माझ्या आवडीशी जुळणारा आहे आणि मला या अत्यंत आगळ्यावेगळ्या पहिल्या सीझनने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोकांसमोर आणलेल्या देशांतर्गत रॅप संगीताबाबत प्रेम वाटते. मला कल्पना आहे की देशात अजूनही टॅलेंट आहे, ज्याचा शोध घेणे गरजेचे आहे आणि मी एमटीव्ही हसल २.० सुरू होऊन देशातील अत्यंत प्रॉमिसिंग रॅप सेन्सेशन जगापुढे आणण्यासाठी उत्सुक आहे.

Web Title: Rapper Badshah will be seen in the judge's chair

टॅग्स :Badshahबादशहा