रंकाळा, जिलेबी आणि विजय-अपूर्वाचं 'जुळता जुळता जुळलंय की'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 17:57 IST2018-12-17T17:56:47+5:302018-12-17T17:57:19+5:30

‘जुळता जुळता जुळतंय की’ ही मालिका आता मनोरंजक वळणावर पोहचली आहे. रंकाळासारख्या नयनरम्य ठिकाणी विजय आणि अपूर्वा यांनी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली.

Rankal, Zelbi and Vijay-Apurva match 'Julta Julta Julalay Ki' | रंकाळा, जिलेबी आणि विजय-अपूर्वाचं 'जुळता जुळता जुळलंय की'

रंकाळा, जिलेबी आणि विजय-अपूर्वाचं 'जुळता जुळता जुळलंय की'

ठळक मुद्दे विजयने अपूर्वाला केला प्रपोज

कालपर्यंत कोल्हापूरमधील रंकाळा तलाव हा पर्यटकांसाठी फिरण्याचा, करमणुकीचा स्पॉट होता पण सोनी मराठीवरील अपूर्वा आणि विजय यांचे जुळल्यापासून आता या रंकाळा स्पॉटला प्रेमाचे रुप मिळाले आहे. ‘जुळता जुळता जुळतंय की’ ही मालिका आता मनोरंजक वळणावर पोहचली आहे. रंकाळासारख्या नयनरम्य ठिकाणी विजय आणि अपूर्वा यांनी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली. प्रेम युगलांसाठी आता आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी रंकाळा हे ठिकाण प्रसिद्ध होणार आणि प्रत्येकाच्या प्रेम-भावना व्यक्त होत असताना कोल्हापूरला रंकाळा तलाव प्रेमाचा साक्षीदार असणार आहे.  

‘जुळता जुळता जुळतंय की’मध्ये विजयने अपूर्वाला केलेले प्रपोज अगदी लाजवाब होते. स्पेशल थाटात आणि जिलेबीच्या ताटात केलेले हे पहिले खास प्रपोज नक्कीच असेल. जिलेबीमधून लिहलेले ‘माझ्याशी लग्न करणार?’ अशी मागणी घालणे ते देखील रंकाळा तलावात... कोल्हापूरी बाज जपला आहे, असेच म्हणावे लागेल. ‘माझ्याशी लग्न करणार?’ अशी विजयने अपूर्वाला मागणी घातल्यावर एकही शब्द न उच्चारता ‘प्रश्नचिन्ह’ उचलून अपूर्वाने अगदी अलगदपणे आणि प्रेमाने तिचा होकार कळवला. प्रेमाने जगही जिंकता येते असे आपण म्हणतो पण सोनी मराठी आणि विजय-अपूर्वा यांच्या प्रपोज स्टाईलने तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मन जिकंले आहे हे नक्की!
विजयच्या मनातले प्रेम अपूर्वाच्या काळजाला आता कळले आहे आणि शेवटी काय तर यांचे जुळता जुळता जुळलंय की... आता प्रेक्षकांना उत्सुकता फक्त त्यांच्या लग्नाची आणि लग्नात अख्या गावाला जिलेबी वाटणार आहे विजय.

Web Title: Rankal, Zelbi and Vijay-Apurva match 'Julta Julta Julalay Ki'