'रंग माझा वेगळा' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण आहे 'डान्स दीवाने ३'ची स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 07:00 IST2021-07-21T07:00:00+5:302021-07-21T07:00:00+5:30

फार कमी लोकांना माहित आहे, या अभिनेत्रीची बहिण 'डान्स दीवाने ३'ची स्पर्धक आहे.

'Rang Mazha Vegla' fame Actress's sister is the contestant of 'Dance Deewane 3' | 'रंग माझा वेगळा' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण आहे 'डान्स दीवाने ३'ची स्पर्धक

'रंग माझा वेगळा' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण आहे 'डान्स दीवाने ३'ची स्पर्धक

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत लावण्याच्या भूमिकेतून अभिनेत्री शाल्मली टोळ्ये घराघरात पोहचली. फार कमी लोकांना माहित असेल की शाल्मली टोळ्येची सख्खी बहिण पल्लवी तोळ्ये सध्या डान्स दीवाने ३मध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये ती आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे.

पल्लवी तोळे ही डान्सर आहे तसेच बॉलिवूडमधील बऱ्याच नामवंत कोरिओग्राफरच्या हाताखाली तिने असिस्टंट म्हणून काम केले आहे. डीआयडी सुपर मॉम्स सीझन २ मध्ये तिने सहभाग घेतला होता. या शिवाय आजवर वेगवेगळ्या स्टेजवरून तिने आपल्या नृत्याची अदाकारी सादर केली आहे. सह्याद्री वाहिनीच्या दम दमा दम सीझन २ चे सूत्रसंचालनही तिने केलेले होते.


पल्लवीला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. बहिणीच्या प्रेरणेनेच ती आजवर हे यश गाठू शकली आहे. कथ्थक आणि फोक डान्समध्ये तिने प्रशिक्षण घेतले आहे. शालेय, आंतरशालेय स्पर्धांमध्ये ती नेहमीच सहभाग घ्यायची.

कॉलेजमध्ये गेल्यावर आर्थिक चणचण भासू लागली त्यामुळे नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत नोकरीचा शोध घेतला यातून तिला तिच्या एका मैत्रिणीने डान्ससाठी ऑडिशन द्यायचा सल्ला दिला. पल्लवीने त्यानंतर कधी मागे वळून पाहिलेच नाही. अनेक मोठमोठ्या स्टार्सच्या कोरिओग्राफर्ससोबत तिला काम करण्याची संधी मिळाली यातून सिनेडान्सर असोसिएशनची ती सदस्य बनली. 


प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि अभिनेता विठ्ठल पाटील सोबत लग्न केले. विठ्ठल पाटील यांनी सोनी मराठीवरील सुपर डान्सर महाराष्ट्र या शोमध्ये परीक्षकाची भूमिका बनवली होती.

याशिवाय काही जाहिरात, विरप्पन सारखी वेबसिरीजमध्ये काम केले आहे. रिंगण चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Web Title: 'Rang Mazha Vegla' fame Actress's sister is the contestant of 'Dance Deewane 3'