प्रत्येक वेळेस स्त्रीनेच का अग्नीपरीक्षा द्यावी मताशी दीपा ठाम,रंग माझा मालिकेत पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 15:09 IST2021-04-28T15:06:24+5:302021-04-28T15:09:57+5:30

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व मालिका व चित्रपटांचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

rang maza vegla Tv Serial New Twist Will Shock You | प्रत्येक वेळेस स्त्रीनेच का अग्नीपरीक्षा द्यावी मताशी दीपा ठाम,रंग माझा मालिकेत पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट

प्रत्येक वेळेस स्त्रीनेच का अग्नीपरीक्षा द्यावी मताशी दीपा ठाम,रंग माझा मालिकेत पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट

'रंग माझा वेगळा' मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आई होण्याचं सुख दीपाच्या पदरी पडलं खरं पण ते तिला उपभोगता येत नाही आहे. कारण खुद्द कार्तिकनेच दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत पितृत्व नाकारलं आहे. डीएनए टेस्ट कर अथवा घर सोडून जा असे दोन पर्याय असताना स्वाभिमानी दीपाने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आनंदाच्या या काळात दीपाला कार्तिकची साथ मिळत नाहीय. दीपाच्या पोटात असलेलं बाळ आपलं नाही असा गैरसमज कार्तिकला झाला आहे. दीपावर पूर्ण विश्वास ठेवणारा कार्तिक आज तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला आहे. कार्तिकच्या विचित्र वागण्यामुळे दीपा सध्या प्रचंड तणावात आहे.


दीपाच्या रंगावर प्रश्न उठवले गेले पण ती शांत राहिली, तिच्या अस्तित्वावर प्रश्न उठवले गेले पण तरीही ती शांत राहिली मात्र जेव्हा तिच्या चारित्र्यावर संशय उठवला गेला तेव्हा मात्र तिने याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. कार्तिकचं घर सोडून ती मोठ्या आशेने माहेरी आलीय. मात्र इथेही बाबांनी तिला पुन्हा सासरी जाण्याचाच सल्ला दिला आहे.

 

त्यामुळे या कठीण काळात दीपाला कोण साथ देणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.आजवर इतिहासात अग्निपरीक्षा दिलेल्या असंख्य पतिव्रता आपण पाहिल्या आहेत. पण पातिव्रत्य सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळेस स्त्रीनेच का अग्नीपरीक्षा द्यावी या मताशी दीपा ठाम आहे. त्यामुळे दीपाचा पुढचा प्रवास नेमका कसा असणार याची उत्सुकता असेल.

'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या डोहाळे कार्यक्रमादरम्यान कलाकारांनी बनवला मजेशीर रील, पहा व्हिडीओ

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व मालिका व चित्रपटांचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. दरम्यान रंग माझा वेगळा मालिकेत नुकतेच दीपाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या शूटदरम्यान या मालिकेतील कलाकारांनी सेटवर मजेशीर रील बनवला आहे. हा रील दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
 

Web Title: rang maza vegla Tv Serial New Twist Will Shock You