राणादा उर्फ हार्दीक जोशी नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार या अभिनेत्रीसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 16:18 IST2021-08-27T16:17:55+5:302021-08-27T16:18:29+5:30

अभिनेता हार्दीक जोशी नवीन मालिकेत नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Ranada alias Hardik Joshi will be seen in a new role with the actress | राणादा उर्फ हार्दीक जोशी नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार या अभिनेत्रीसोबत

राणादा उर्फ हार्दीक जोशी नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार या अभिनेत्रीसोबत

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंनी रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. प्रेक्षक आजही त्यांना मिस करतात. राणादाची भूमिका अभिनेता हार्दीक जोशीने साकारली होती आणि त्याला या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. त्यामुळे त्याला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. आता तो नवीन मालिकेत नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

अभिनेता हार्दीक जोशी झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हार्दीक जोशीने मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिले की, नाती डोक्यात राहणे कठीण काम आहे पण मनात मात्र सगळ्यांसाठी स्थान आहे  या प्रोमोमध्ये अभिनेत्री अमृता नवऱ्या मुलाकडील नातेवाईकांची नाव लक्षात ठेवताना दिसते आहे. नवी मालिका 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ३० ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री ९ वाजता प्रसारीत होणार आहे. 


यापूर्वी 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेून राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेसाठी हार्दिकला तीन वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळाल्या होत्या. राणा दा, राजा राजगोंडा आणि कॉन्स्टेबल रणविजय गायकवाड! मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही भूमिकांसाठी हार्दिकने स्वतःच्या अभिनयावरच नाही तर शरीरावरसुद्धा मेहनत घेतली होती.

राणाची भूमिका कुस्तीपटूची असल्यामुळे हार्दिकने १५ किलो वजन वाढवले होते तर रणविजय गायकवाड या भूमिकेसाठी १५ दिवसांत ८ किलो वजन त्याच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली कमी केले होते. त्यामुळे त्याचे खूप कौतुक झाले होते. त्यामुळे नव्या मालिकेतून अमृता पवारसह हार्दिक जोशीच्या जोडीला रसिक किती पसंती देतात हे पाहणे रंजक असणार आहे.

Web Title: Ranada alias Hardik Joshi will be seen in a new role with the actress