हे भन्नाट मीम्स तुम्ही पाहिलेत? काय आहे रामायणातील लक्ष्मणाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 12:50 IST2020-04-14T12:48:31+5:302020-04-14T12:50:26+5:30

30 वर्षांपूर्वी सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे मीम्स, जोक्स हेही नव्हते. पण आज रामायणातील प्रत्येक पात्रावरचे मीम्स व्हायरल होत आहेत. 

ramayan lakshman tv actor sunil lahri reacts on memes-ram |   हे भन्नाट मीम्स तुम्ही पाहिलेत? काय आहे रामायणातील लक्ष्मणाची प्रतिक्रिया

  हे भन्नाट मीम्स तुम्ही पाहिलेत? काय आहे रामायणातील लक्ष्मणाची प्रतिक्रिया

ठळक मुद्देतर पुन्हा लक्ष्मणाचीच भूमिका करेल

लॉकडाऊनमुळे मनोरंजन दुनियेचे काम ठप्प पडल्यावर दूरदर्शनने आपल्या गाजलेल्या मालिका परत सुरु केल्या. रामायण, महाभारत या पौराणिक मालिका पुन्हा दूदर्शनवर प्रसारित झाल्या. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. विशेषत: रामायण या मालिकेने तर पुन्हा एकदा सर्वाधिक टीआरपी मिळवत इतिहास रचला आहे. सोशल मीडियावर रामायण ट्रेंड करत आहेत. सोबत या मालिकेवरचे अनेक मीम्स आणि जोक्सही ट्रेंडमध्ये आहेत.

30 वर्षांपूर्वी सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे मीम्स, जोक्स हेही नव्हते. पण आज रामायणातील जवळजवळ प्रत्येक पात्रावरचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांच्यावरही अनेक मीम्स बनत असून ते व्हायरल होत आहेत. या मीम्सवर सुनील यांची काय प्रतिक्रिया आहे?
अलीकडे एका मुलाखतीत सुनील लहरी याबद्दल बोलले. ते म्हणाले, 30 वर्षांनंतर मला पुन्हा इतकी लोकप्रियता मिळतेय, याचा मला आनंद आहे. माझ्यावरचे शेकडो मीम्स व्हायरल होत आहेत. अनेक जण माझ्यासोबत ते शेअर करत आहेत. माझ्या भावाचे मुलेही मला हे मीम्स पाठवतात. हे सगळे मी एन्जॉय करतोय. तुमच्यावर मीम्स बनत असतील तर तुम्ही पॉप्युलर झालात, असे समजा असे म्हटले जाते.  मी सुद्धा पॉप्युलर झालो आहे, याचा मला अभिमान आहे.

तर पुन्हा लक्ष्मणाचीच भूमिका करेल
रामायणात पुन्हा काम करण्याची संधी मिळाली तर कुठले पात्र साकारायला आवडेल? या प्रश्नावर लक्ष्मण असे उत्तर सुनील यांनी दिले. पुन्हा संधी मिळाली तर मला लक्ष्मणाचीच भूमिका करायला आवडेल. कारण या भूमिकेला अनेक छटा आहेत. रावणाच्या भूमिकेलाही अनेक छटा आहेत. पण ते निगेटीव्ह कॅरेक्टर आहे आणि माझा चेहरा ही भूमिका करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे मला पुन्हा संधी मिळाली तर लक्ष्मणाचीच भूमिका करायला आवडेल. कारण त्यावेळी माझ्याकडे अनुभव नव्हता़ जितका आज अनुभव आहे, असे ते म्हणाले.

Web Title: ramayan lakshman tv actor sunil lahri reacts on memes-ram

टॅग्स :ramayanरामायण