Rakhi Sawant Marriage : गुलाबी गाऊनमध्ये राखीची एंट्री, 'ड्रामा क्वीन'चा नवऱ्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 13:45 IST2023-01-12T13:42:56+5:302023-01-12T13:45:50+5:30
राखीचा रिसेप्शन लुक खूपच ग्लॅमरस दिसतोय. मी तुझ्यासोबत प्रत्येक अडचणींना सामोरी जायला तयार आहे असेही तिने म्हणले आहे.

Rakhi Sawant Marriage : गुलाबी गाऊनमध्ये राखीची एंट्री, 'ड्रामा क्वीन'चा नवऱ्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल
Rakhi Sawant Marriage : सोशल मीडिया सेन्सेशन राखी सावंत आता चर्चेत आहे तिच्या लग्नामुळे. बॉयफ्रेंड आदिलसोबत तिने नुकताच निकाह केला. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र हे लग्न सात महिन्यांपूर्वीच झाल्याचे तिने सांगितले. आता तिचा रिसेप्शनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
राखी तिचा नवरा आदिलसोबत रिसेप्शनसाठी तयार झाल्याचे दिसत आहे. यात तिने गुलाबी रंगाचा गाऊन घातलेला दिसत आहे. तर हातात सिल्व्हर रंगाची छोटी बॅग आहे. राखीचा रिसेप्शन लुक खूपच ग्लॅमरस दिसतोय. मी तुझ्यासोबत प्रत्येक अडचणींना सामोरी जायला तयार आहे अशा डायलॉगचे रील तिने बॅकग्राऊंडला लावले आहे. 'जस्ट मॅरिड' असे तिने व्हिडिओवर लिहिले आहे.
राखी नुकतीच 'बिग बॉस मराठी ४' मध्ये सहभागी झाली होती. तिने टॉप ५ पर्यंत मजल मारली. मात्र फिनालेला ती ९ लाख रुपये घेऊन स्पर्धेबाहेर पडली. राखीची आई सध्या ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे.
राखी सावंतचे हे दुसरे लग्न आहे. तिने काही काळापूर्वी रितेश राजशी लग्न केले होते. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तोपर्यंत राखीने रितेशचा चेहरा कोणालाही दाखवला नव्हता. मात्र, बिग बॉस १५ मध्ये रितेशनेही राखीसोबत एन्ट्री घेतली आणि त्यानंतर रितेशला पाहून लोक चकित झाले. राखीने शोमध्ये हे देखील उघड केले की रितेश आधीच विवाहित असल्याने तिचे आणि रितेशचे हे लग्न वैध नाही. त्याचवेळी शोमधून बाहेर आल्यानंतर राखीने रितेशसोबतचे संबंध तोडले, त्यानंतर ती आदिलला डेट करु लागली. आता दोघेही विवाहित आहेत.