Rakhi Sawant : 'मेरी शादी खतरे मे है!' म्हणत फोडला हंबरडा, राखी सावंतचा नवीन 'ड्रामा' बघा; होतेय ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 16:37 IST2023-02-01T16:36:28+5:302023-02-01T16:37:03+5:30
तू मुझे मार क्यू नही देता खुदा. माझं लग्न धोक्यात आहे, राखी सावंतचा ड्रामा सुरु

Rakhi Sawant : 'मेरी शादी खतरे मे है!' म्हणत फोडला हंबरडा, राखी सावंतचा नवीन 'ड्रामा' बघा; होतेय ट्रोल
Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यात पुन्हा एक वादळ आले आहे. दोन दिवसांपूर्वीच राखी सावंतच्या आईचे निधन झाले. या धक्क्यातून राखी सावरते तोच आता नवीन अडचण तिच्या आयुष्यात आली आहे. तिचे लग्न धोक्यात आहे असं म्हणत तिने अक्षरश: हंबरडा फोडला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
राखी सावंतला मनोरंजन विश्वातील ड्रामा क्वीन का म्हणले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २८ जानेवारी रोजी राखीच्या आईचे निधन झाले. यानंतरही तिने कॅमेऱ्यासमोर नाटकं केली. आईच्या निधनानंतर ४ दिवसातच राखीचा नवीन ड्रामा समोर आला आहे.सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीचा नवीन व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. माझं लग्न धोक्यात आहे असं म्हणत ती अक्षरश:हंबरडा फोडते.
व्हिडिओत राखी म्हणते, 'मी खूप डिस्टर्ब आहे. माझं लग्न धोक्यात आहे. तू मुझे मार क्यू नही देता खुदा. माझं लग्न धोक्यात आहे मला माझं लग्न वाचवायचं आहे. लग्न म्हणजे काही जोक नाही. माझ्या आयुष्यात येऊन कोणाला काय मिळतं. माझ्या वैवाहिक जीवनात येऊन कोणाला काय मिळतं. छळ बंद करा, बंद करा छळ.'
राखीच्या या व्हिडिओवर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. 'हिची आई नुकतीच गेली आणि ड्रामा परत सुरु झाला' अशी कमेंट एकाने केली आहे. 'फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी हे सुरु आहे' अशीही कमेंट युझर्सने केली आहे.
राखीने ८ महिन्यांपूर्वीच आदिल दुर्रानी खान सोबत लग्नगाठ बांधली. मात्र इतके महिने तिने लग्नाची कानोकान खबर लागू दिली नाही. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर राखीने रजिस्टर मॅरेज केल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न झाले असल्याचे जाहीर केले. मात्र आदिलने बरेच दिवस माध्यमांसमोर लग्न कबूल केले नव्हते. अखेर सलमान खानच्या मध्यस्थीनंतर आदिलने लग्न जाहीररित्या कबूल केले. राखीच्या आईच्या निधनानंतर आदिलने तिला आधार दिला. मात्र आता दोघांमध्ये नेमके काय बिनसले हे लवकरच कळेल.