राखी सावंतने जवळच्या मित्रांना सांगितली नाहीये 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 11:54 IST2019-08-27T11:53:04+5:302019-08-27T11:54:28+5:30

राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून ती लग्नाला घेऊन चर्चेत आहेत. राखीच्या म्हणण्यानुसार तिने सीक्रेट मॅरेज केले आहे.

Rakhi sawant marriage husband her close friends have not seen yet | राखी सावंतने जवळच्या मित्रांना सांगितली नाहीये 'ही' गोष्ट

राखी सावंतने जवळच्या मित्रांना सांगितली नाहीये 'ही' गोष्ट

राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून ती लग्नाला घेऊन चर्चेत आहेत. राखीच्या म्हणण्यानुसार तिने सीक्रेट मॅरेज केले आहे. मात्र अद्याप कुणालाच कळले नाही की राखीचा नवरा कोण आहे ते. मात्र आश्चर्याची गोष्ट ही आहे की राखीच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना माहिती नाही की राखीने कुणाशी लग्न केले आहे ते.  


 आजतकच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान राखीची सावंतच्या जवळच्या व्यक्तिने सांगितले की, तिचा पती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. तशी तर मला राखीच्याबाबतीत प्रत्येक लहान गोष्ट माहिती आहे. मात्र राखीचा नवरा कोण आहे हे माहिती नाही. त्यामुळे राखी सावंत लग्नाचे रिसेप्शन कधी देणार याची वाट तिचे मित्र-मैत्रीणी पाहत होते.   


राखीने पतीचा एकही फोटो शेअर न केल्याने हे लग्नही तिचा एक ड्रामा असावा, असा अनेकांचा समज झाला होता. अद्यापही राखीने लग्न केले, हे मानायला लोक तयार नाहीत. पण कदाचित राखीचे लग्न झालेय आणि राखी म्हणते त्याप्रमाणे, तिच्या पतीला मीडियासमोर यायचे नाही.


माझा पती एनआरआय आहे. त्याचे नाव रितेश आहे आणि तो युकेचा आहे. लग्नानंतर तो लगेच परत गेला. माझ्या व्हिसाची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाली की, मी त्याच्याजवळ जाईल,’ असे राखीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. गत 29 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते. लग्नाची बातमी लपवून ठेवण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये लग्न केले गेले होते.
 

Web Title: Rakhi sawant marriage husband her close friends have not seen yet