Rakhi Sawant : "मी त्याला माफ केलं तर माझ्या जीवाला..." आदिलने राखीला तुरुंगातून केला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 10:56 IST2023-05-02T10:54:52+5:302023-05-02T10:56:25+5:30

नुकतंच आदिलचा तुरुंगातून राखीला फोन आला असल्याचं तिने पापाराझींसमोर सांगितलं.

Rakhi Sawant gets a call from husband adil from jail says want divorce my life is in danger | Rakhi Sawant : "मी त्याला माफ केलं तर माझ्या जीवाला..." आदिलने राखीला तुरुंगातून केला फोन

Rakhi Sawant : "मी त्याला माफ केलं तर माझ्या जीवाला..." आदिलने राखीला तुरुंगातून केला फोन

एंटरटेन्मेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिचा पती आदिल खानची (Adil Khan) मध्यंतरी चांगलीच चर्चा होती. आधी खुल्लमखुल्ला प्रेम, लग्न आणि नंतर एकमेकांवर गंभीर आरोप यामुळे दोघांचं नातं गाजलं होतं. राखीने आदिलवर मारहाण, फसवणूक, गर्भपात सारखे अनेक आरोप लावले. यानंतर आदिलला अटक करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून आदिल जेलमध्येच आहे.  

नुकतंच आदिलचा तुरुंगातून राखीला फोन आला असल्याचं तिने पापाराझींसमोर सांगितलं. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. राखी म्हणाली,"आदिलचा मला फोन आला. त्याने माझी माफी मागितली. मी त्याला म्हटलं तू माझं आयुष्य खराब केलंस. आता मी त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकत नाही. मी घाबरले आहे."

राखी पुढे म्हणाली,"मी त्याला सांगितलं की तू बाहेर ये आणि मला घटस्फोट दे. पण त्याने माझी माफी मागितली आणि घटस्फोट देण्यास नकार दिला. आता मी जर त्याला माफ केलं तर माझ्या जीवाला धोका आहे."

तर राखीला आता घटस्फोट हवा आहे आणि आदिल मात्र नकार देतोय. आता राखी आणखी काय ड्रामा करणार हे बघणं इंटरेस्टिंग असेल. तसंच आदिल बाहेर आल्यानंतर राखीची काय अवस्था होईल हा देखील प्रश्नच आहे.

Web Title: Rakhi Sawant gets a call from husband adil from jail says want divorce my life is in danger