राकेश बापट पाठोपाठ त्याची Ex पत्नीही रिएलिटी शोमध्ये घेणार एन्ट्री, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:57 IST2026-01-22T10:49:22+5:302026-01-22T10:57:38+5:30
बिग बॉस मराठीच्या घरात राकेशने त्याची एक्स पत्नी रिद्धी डोग्राबाबत भाष्य केलं होतं. वेगळे झाल्यानंतरही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं राकेशने म्हटलं होतं. राकेश पाठोपाठ आता रिद्धीदेखील रिएलिटी शोमध्ये एन्ट्री घेणार आहे.

राकेश बापट पाठोपाठ त्याची Ex पत्नीही रिएलिटी शोमध्ये घेणार एन्ट्री, कोण आहे ती?
बिग बॉस मराठी ६मुळे राकेश बापट चर्चेत आला आहे. या रिएलिटी शोमधील खेळामुळे त्याचं प्रचंड कौतुकही होत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात राकेशने त्याची एक्स पत्नी रिद्धी डोग्राबाबत भाष्य केलं होतं. वेगळे झाल्यानंतरही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं राकेशने म्हटलं होतं. राकेश पाठोपाठ आता रिद्धीदेखील रिएलिटी शोमध्ये एन्ट्री घेणार आहे. 'दी फिफ्टी (The 50)' या रिएलिटी शोमध्ये रिद्धी एन्ट्री घेणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत रिद्धीने चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.
रिद्धीने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. ती म्हणते, "पापाराझींच्या लेन्सपासून दूर…थेट सिंहाच्या गुहेत प्रवेश!!! एक कलाकार म्हणून मी नेहमीच स्वतःला नव्याने घडवण्याचं, जुनी सवय मोडण्याचं आणि आपण ज्या सुरक्षित चौकटीत अडकतो त्यातून बाहेर पडण्याचे नवे मार्ग शोधत असते. स्वतःबद्दल काहीतरी नवीन शोधण्याची हीच माझी ओढ आहे. #The50 हा माझ्यासाठी असा एक आव्हानात्मक प्रवास आहे, जो मला माझ्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे, एका पूर्णपणे नव्या जगात घेऊन जाणार आहे. जिथे ना ऑन-स्क्रीन कोणतीही भूमिका मला साकारायची नाही. इथे मी फक्त ‘मी’ म्हणून समोर येणार आहे. आणि तुम्ही...माझे प्रेक्षक...माझा हा कम्फर्ट झोनच्या पलीकडचा प्रवास पाहणार आहात".
"तुम्ही नेहमीच मला प्रेम दिलं आहे, प्रोत्साहन दिलं आहे. माझे प्रेक्षक, माझे शुभेच्छुक हेच माझं खऱ्या अर्थाने बळ आहेत. THE 50 चा हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण आता मी स्वतः पाहायला निघाले आहे की ही सिंहाची गुहा नेमकी कशी आहे! माझ्यावर तुमचं प्रेम कायम ठेवा आणि तुमच्या प्रार्थनांमध्ये थोडीशी जागा माझ्यासाठीही ठेवा", असंही तिने पुढे म्हटलं आहे. 'दी फिफ्टी (The 50)' हा शो येत्या १ फेब्रुवारीपासून जिओ हॉटस्टार आणि कलर्सवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
रिद्धी डोग्रा कोण आहे?
रिद्धी डोग्रा ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. टेलिव्हिजनपासून करिअरला सुरुवात केलेल्या रिद्धीने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. द साबरमती रिपोर्ट, जवान, विस्फोट, अबीर गुलाल या सिनेमांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. २०११ मध्ये रिद्धी आणि राकेशने लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर ८ वर्षांनी २०१९ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.