बहू हमारी रजनी_कांतमध्ये रजनीचा डबल रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:23 IST2017-01-27T10:55:23+5:302017-01-27T17:23:10+5:30
बहू हमारी रजनी_कांत ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण या मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे या ...

बहू हमारी रजनी_कांतमध्ये रजनीचा डबल रोल
ब ू हमारी रजनी_कांत ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण या मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे या मालिकेच्या टीमने ठरवले आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एक आश्चर्याचा धक्का मिळणार आहे. या कार्यक्रमात रजनीची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची आहे. या मालिकेत आता रजनी प्रेक्षकांना डबल रोल साकारताना दिसणार आहे.
रजनीची भूमिका साकारणारी रिधिमा पंडित डबल रोल साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे. रजनीसारखीच दिसणारी मुलगी शर्मिला आणि शोगोता यांना दिसणार आहे. पण ती प्रचंड चिंतेत असल्याने ते दोघे तिला आपल्या घरी घेऊन येणार आहेत. ही आपलीच रजनी असल्याचा त्यांचा समज होणार आहे.
रजनीला ते घरी घेऊन जाणार असले तरी ती रजनी नसून रजनीसारखी जिसणारी रज्जो आहे. रज्जो आपल्या पतीला कंटाळून घरातून पळून आलेली आहे. रज्जो घरात आल्यावर सुरीलाला चांगलाच धक्काच बसणार आहे. या सगळ्या गोंधळामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होणार आहे यात काही शंकाच नाही.
काही दिवसांपूर्वी बहू हमारी रजनी_कांत या मालिकेच्या रटाळ कथानकामुळे रसिक या मालिकेला पसंती देत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. रसिकांनी या मालिकेकडे पाठ फिरवू नये यासाठी मालिकेत नाविण्य आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यासाठी या मालिकेत पाच वर्षांचा लीप घेण्यात आला होता. रोबो असलेल्या रजनीची मेमरी डिलीट करण्यात आली होती आणि त्यानंतर या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळाले होते. पण यामुळे मालिकेच्या टीआरपीवर परिणाम न झाल्याने या मालिकेला निरोप देण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.