Raju Srivastava Last Rites:   राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप, पत्नी शिखाची रडून रडून झालीये अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 12:38 IST2022-09-22T12:37:22+5:302022-09-22T12:38:20+5:30

Raju Srivastava Last Rites: आज जड अंत:करणाने राजू यांना अंतिम निरोप  देण्यात आला. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते दु:खी आहे. पत्नी शिखा यांची अवस्था तर वाईट आहे. 

raju srivastava last rites wife shikha srivastava emotional cries see pic | Raju Srivastava Last Rites:   राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप, पत्नी शिखाची रडून रडून झालीये अशी अवस्था

Raju Srivastava Last Rites:   राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप, पत्नी शिखाची रडून रडून झालीये अशी अवस्था

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचं काल निधन झालं. तब्बल 41 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज जड अंत:करणाने राजू यांना अंतिम निरोप  देण्यात आला. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते दु:खी आहे. पत्नी शिखा (Raju Srivastava  Wife Shikha ) यांची अवस्था तर वाईट आहे. 
राजू बरे होऊन घरी परततील, असं पत्नी शिखा व मुलांना वाटत होतं. गेल्या 41 दिवस कुटुंब रात्रंदिवस प्रार्थना करत होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. पतीच्या निधनानंतर शिखा यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. 
पतीच्या निधनानंतर शिखा यांचा पहिला फोटो समोर आला आहे. पतीला गमावल्याचं दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. 

माझ्या पतीनं खूप संघर्ष केला. मी दिवसरात्र त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. राजू घरी येतील, असा विश्वास मला वाटत होता. पण असं काहीही घडलं नाही. मी फक्त इतकंच म्हणेल की, ते खरे फाइटर होते, असं काल त्या म्हणाल्या.

राजू श्रीवास्तव पत्नीवर प्रचंड प्रेम करायचे. राजू श्रीवास्तव यांनी शिखा यांना पहिल्यांदा आपल्या भावाच्या लग्नाच्या वरातीत पाहिलं होतं. हे लग्न फतेहपूरमध्ये होतं. शिखा यांना पाहताच क्षणी राजू त्यांच्या प्रेमात पडले होते. त्याचवेळी राजूंनी शिखाशी लग्न करण्याचा मनोमनी निश्चय केला होता. त्यानंतर त्यांनी शिखा यांची माहिती काढायला सुरुवात केली. त्यांना समजलं की त्या त्यांच्या भावाच्या बायकोची चुलत बहीण आहे. अर्थातच भावाची चुलत मेहुणी आहे.
राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या भावांशी संबंध वाढवले. एका मुलाखतीदरम्यान राजू श्रीवास्तव यांनी ही लव्हस्टोरी सांगितली होती. शिखा माझी पत्नी आहे. पण आमचं लग्न इतक्या सहजासहजी झालं नव्हतं. आम्ही 12 वर्षे प्रतीक्षा केली.  राजू श्रीवास्तव यांनी 1993 मध्ये शिखा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे. मुलाचं नाव आयुष्मान आहे तर मुलीचं नाव अंतरा आहे.

Web Title: raju srivastava last rites wife shikha srivastava emotional cries see pic