राजेंद्र सेठीने 'बँड बाजा बंद दरवाजा' मालिका 'ह्या' कारणामुळे स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 07:15 IST2019-02-03T07:15:00+5:302019-02-03T07:15:00+5:30

सोनी सब वाहिनीवरील बँड बाजा बंद दरवाजा मालिकेमध्ये चंदन खुराणाच्या भूमिका अभिनेता राजेंद्र सेठी साकारत आहेत.

Rajendra Sethi accepted the 'Band Baja Band Darwaza' series due to 'The reason' | राजेंद्र सेठीने 'बँड बाजा बंद दरवाजा' मालिका 'ह्या' कारणामुळे स्वीकारली

राजेंद्र सेठीने 'बँड बाजा बंद दरवाजा' मालिका 'ह्या' कारणामुळे स्वीकारली

ठळक मुद्दे'बँड बाजा बंद दरवाजा' ही हलकीफुलकी भीतीदायक विनोदी मालिका

सोनी सब वाहिनीवरील बँड बाजा बंद दरवाजा मालिकेमध्ये चंदन खुराणाच्या भूमिका अभिनेता राजेंद्र सेठी साकारत आहेत. 'बँड बाजा बंद दरवाजा' ही हलकीफुलकी भीतीदायक विनोदी मालिका असून यात संजीव शर्माची भूमिका मुकेश तिवारीने साकारली आहे आणि या मालिकेची कथा संजीव शर्माभोवती फिरते. तो २५ वर्षांनंतर त्‍याच्‍या पूर्ण होऊ न शकलेल्‍या प्रेमिकेच्‍या जीवनामध्‍ये भूत बनून परत येतो, यावर आधारीत मालिकेचे कथानक आहे.

राजेंद्र सेठी म्हणाला की, खरे सांगायचे तर ह्या शो साठी जे प्रतिभावान अभिनेते एकत्र आले त्यानेच मी आकर्षित झालो आणि मालिकेत काम करण्यास होकार दिला. मालिकेची मूळ संकल्पना अशी आहे की जेव्हा कधी लग्नाचा विषय निघतो तेव्हा त्यात एक भूत समस्या निर्माण करते कारण या घरात लग्न होऊ नये असे त्याला वाटते. त्याला असे का वाटते हे प्रेक्षकांना मालिका बघताना कळेलच.
आपल्या भूमिकेबद्दल त्याने सांगितले की, चंदन खुराणा हा एक आनंदी माणूस आहे. दुर्दैवाने त्याच्या आयुष्यात एक शोकांतिका आहे ती म्हणजे त्याची
सासू जी लग्न होऊन कित्येक वर्षे झाली तरी त्याला आवडत नाही. शिवाय तिलाही तो का आवडत नाही ते माहीत नाही. पण काहीतरी कारण आहे ज्यामुळे ती त्याचा द्वेष करते आणि त्याला टोचून बोलण्याची एकही संधी सोडत नाही, तिचा जावई एक बँडवाला आहे हे तिच्या पचनी पडत नाही.

Web Title: Rajendra Sethi accepted the 'Band Baja Band Darwaza' series due to 'The reason'