शुभमंगल सावधान..! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले लग्नबेडीत, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 14:43 IST2021-07-16T14:42:32+5:302021-07-16T14:43:10+5:30

बिग बॉस १४ मधून चर्चेत आलेला गायक राहुल वैद्यने अखेर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्न केले आहे

Rahul Vaidya and Disha Parmar are stuck in a wedding bed, watch this video | शुभमंगल सावधान..! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले लग्नबेडीत, पहा हा व्हिडीओ

शुभमंगल सावधान..! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले लग्नबेडीत, पहा हा व्हिडीओ

रिएलिटी शो बिग बॉस १४ मधून चर्चेत आलेला गायक राहुल वैद्यने अखेर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्न केले आहे. मुंबईतील हयात हॉटेलमध्ये त्या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत गायक राहुल
वैद्य वराच्या गेटअपमध्ये गुडघ्यावर बसून दिशा परमारला रिंग घालताना दिसतो आहे. या व्हिडीओतील राहुल वैद्यच्या अंदाजाने सर्वांचे मन जिंकले आहे.

राहुल गुडघ्यावर बसून दिशाला अंगठी घालत असताना ती कावरीबावरी झाली होती. ती खूप लाजताना दिसते आहे.

राहुल आणि दिशाच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे.


राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्नाच्या आधीचे मेहंदी आणि हळदी सेरेमनीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळते आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. 

राहुल वैद्यने दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टेलीव्हिजनवरूनच सर्वांसमोर तिला प्रपोज केलं होतं. ८ नोव्हेंबरला दिशाचा वाढदिवस होता आणि त्याचवेळी राहुलने बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसमोर दिशाला लग्नासाठी मागणी घातली होती. अशाप्रकरे पहिल्यांदाच राहुलने थेट टीव्हीवर त्याच्या प्रेमाची कबूली दिली होती.

Web Title: Rahul Vaidya and Disha Parmar are stuck in a wedding bed, watch this video