"कुणाला दोष द्यायचा नाही, पण काहीच काम नसल्यानं Bigg Boss 10 करावं लागलं!"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 01:13 PM2022-09-24T13:13:15+5:302022-09-24T13:18:04+5:30

अभिनेता राहुल देवची पत्नी रीना देव यांचे 2009 मध्ये निधन झाले. यानंतर त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.

Rahul Dev says he was forced to do Bigg Boss 10 because he had no work | "कुणाला दोष द्यायचा नाही, पण काहीच काम नसल्यानं Bigg Boss 10 करावं लागलं!"

"कुणाला दोष द्यायचा नाही, पण काहीच काम नसल्यानं Bigg Boss 10 करावं लागलं!"

googlenewsNext

Rahul Dev On His Comeback Struggle:बॉलिवूड अभिनेता राहुल देवचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्यांच्या यादीत येतं. राहुल देवने त्याच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही स्वत:ला सिद्ध केलं आहे. राहुल सिंगल फादर असून तो एकटाच आपल्या मुलाची काळजी घेतो.

अभिनेता राहुल देवची पत्नी रीना देव यांचे 2009 मध्ये निधन झाले. अलीकडेच राहुल देव यांनी सिंगल फादर म्हणून त्याच्या अनुभव शेअर केले आहे. राहुल देवनं एफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की पालकत्व अजिबात सोपे नाही. मुलांच्या संगोपनात महिलांचा मोठा वाटा असतो. स्त्रियांकडे मुलांना वाढवताना खूप संयम असतो. मी पण खूप प्रयत्न केले आणि केले पण असे काही वेळा होते जेव्हा माझा स्वत: वरचा ताबा सुटतो. मला आई आणि वडील दोन्ही बनण्याचा प्रयत्न करावा लागला.

म्हणून बिग बॉसमध्ये जावं लागलं.
अभिनेत्याने पुढे सांगितले की, जेव्हा त्याचा मुलगा पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेला होता, तेव्हा त्याने मुंबईला जाऊन कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस बद्दल पुढे बोलताना अभिनेत्याने म्हटले आहे की इतके काम करूनही बिग बॉस... अभिनेत्याने सांगितले की, माझ्याकडे काम नसल्यामुळे त्याला बिग बॉस 10 मध्ये सहभागी व्हाव लागलं.  अभिनेता पुढे म्हणाला की मी यासाठी कोणाला दोष देणार नाही कारण आमच्या फिल्डमध्ये मार्केट  खूप वेगाने पुढं जातं आणि मग साडेचार वर्षे हा खूप मोठा काळ असतो.
 

Web Title: Rahul Dev says he was forced to do Bigg Boss 10 because he had no work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.