रिटेकला कंटाळून राधिका मदनने सेटवरुन काढला पळ, मग अशी परतली मेरी आशिकी तुमसे हीच्या सेटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 01:12 PM2023-12-05T13:12:03+5:302023-12-05T13:13:49+5:30

बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदन (Radhika Madan) टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाली आहे.

Radhika madan fled from the set of colors tv show meri aashiqui tumse hi after got tired from retakes | रिटेकला कंटाळून राधिका मदनने सेटवरुन काढला पळ, मग अशी परतली मेरी आशिकी तुमसे हीच्या सेटवर

रिटेकला कंटाळून राधिका मदनने सेटवरुन काढला पळ, मग अशी परतली मेरी आशिकी तुमसे हीच्या सेटवर

बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदन (Radhika Madan) टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाली आहे. अंग्रेजी मीडियम सिनेमात तिने इमरान खान च्या मुलीची भूमिका अतिशय उत्तमपणे साकारली. राधिकाने कलर्सच्या 'मेरी आशिकी तुमसे ही' या शोमधून अभिनयात पदार्पण केले. राधिका या मालिकेत शक्ती अरोरासोबत दिसली होती आणि इशानीच्या व्यक्तिरेखा साकारुन ती  घराघरात पोहोचली. टीव्ही . 'पटाखा' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

राधिका मदनने 'मेरी आशिकी तुमसे ही'मध्ये दोन वर्षे काम केले. यादरम्यानचा तिचा  प्रवास खूपच रजंक होता. एकदा अभिनेत्री शोच्या सेटवरून पळूनही गेली होती. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला आहे. अभिनय करणं अवघड असल्याचे तिने सांगितले होते.

राधिका मदनने सांगितले की, एकदा तिला एका सीनसाठी अनेक रिटेक द्यावे लागले. रिटेक देताना ती थकली तेव्हा ती 'मेरी आशिकी तुमसे ही'च्या सेटवरून पळून गेली. हा तिच्या शूटिंगचा पहिला दिवस होता. रिटेकमुळे अभिनेत्री घाबरली आणि त्यानंतर ती स्टुडिओतून पळून गेली. मात्र, नंतर युनिटच्या सदस्यांनी तिला  शोधून सेटवर परत आणले.

'मेरी आशिकी तुमसे ही' व्यतिरिक्त राधिका मदान 'झलक दिखला जा 8' या डान्स रिअ‍ॅलिटी शोचाही भाग आहे. अभिनेत्रीने खुलासा केला होता की तिला नेहमीच डान्सर व्हायचे होते. त्यासाठी तिने डान्स अॅकॅडमीतही अ‍ॅडमिशन घेतलं होते, पण त्याच दरम्यान त्याला 'मेरी आशिकी तुमसे ही'ची ऑफर आली.

Web Title: Radhika madan fled from the set of colors tv show meri aashiqui tumse hi after got tired from retakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.