"राधा प्रेम रंगी रंगली" मालिकेला नवे वळण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 16:28 IST2018-05-22T10:58:19+5:302018-05-22T16:28:19+5:30

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये राधा आणि प्रेम यांच्या मध्ये सगळेच सुरळीत चालू होते. राधाने प्रेमचा व्यवसाय चालविण्यास मदत ...

'Radha Prem Rangi Rangali' 'new turn to the series! | "राधा प्रेम रंगी रंगली" मालिकेला नवे वळण !

"राधा प्रेम रंगी रंगली" मालिकेला नवे वळण !

धा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये राधा आणि प्रेम यांच्या मध्ये सगळेच सुरळीत चालू होते. राधाने प्रेमचा व्यवसाय चालविण्यास मदत करणे, त्याच्यासोबत ऑफिसला जाणे, राधाचा प्रेमला पुरेपूर आधार मिळत होता. प्रेमने राधाच्या पाठिंब्याने त्याच्या आयुष्यातले खूप मोठे सत्य देखील पचवले होते कि तो माधुरीचा मुलगा नसून त्याला दत्तक घेतले होते. राधाने खूप आव्हांनाना पार करत मोठ्या जिद्दीने स्वत:चा संसार सांभाळला होता. प्रेमच्या मनामध्ये देखील तिने स्वत:ची हक्काची अशी जागा राधाने बनवली होती. परंतु हे सगळे मात्र दिपीकाची आई देवयानी हिला रुचले नव्हते. तिने राधा आणि प्रेमच्या विरोधात खूप मोठे कारस्थान रचले आणि त्यामध्ये ती यशस्वी देखील झाली. देवयानीने राधाच्या भोळ्या स्वभावाला लक्षात घेऊन तिला विषप्राशन करण्यास मजबूर केले. आणि प्रेमच्या प्रेमाखातर हे करण्यास राधा तयार देखील झाली. राधा आता प्रेमच्या आयुष्यात नाही म्हणजेच आपल्या आयुष्यात नाही याची कल्पना देखील प्रेमला नाहीये. प्रेमला हे सत्य कळाले तर ? प्रेमसमोर देवयानीचा खरा चेहरा आला तर ? दीपिकाचे आयुष्य सावरण्यासाठी देवयानीने राधाला मारून टाकले हे सत्य आता फक्त आदित्यला कळाले असून, आता पुढे मालिकेमध्ये काय होणार ? 
 
देवयानीने प्रेमला पूर्णत: आपल्या जाळ्यामध्ये अडकवले आहे. संपूर्ण कुटुंबाला ती बंगलोर मध्ये विपश्चना सेंटरमध्ये आहे असे तिच्याच मोबाईल वरून मेसेज करून सांगितले आहे. यावर सगळ्यांचा विश्वास देखील बसला आहे. परंतु आता इन्सपेक्टर राजे देखील देवयानीची साथ देत असून त्याने प्रेमला खोटे सांगितले आहे कि, राधा सेंटर मध्ये सुरक्षित आहे. परंतु ती आणि कश्यप नावाचा मुलगा नेहमी एकत्र असतात असे सेंटरच्या लोकांचे म्हणणे आहे. तसेच राजे यांच्या माणसाने त्याला असे सांगितले आहे कि, राधाचे वडिल इथे येऊन राधाला भेटून गेले आणि त्यांच्यामध्ये पत्रिकाबद्दल काही बोलणे झाले आणि त्याने राधाला त्याच्याशी लग्न करून एक गोड बातमी देण्यास सांगितले आहे. ज्यावर प्रेमचा अजिबात विश्वास बसत नाही. हे सगळे घडत असताना आदित्यला देवयानीने ब्लॅकमेल केले आहे कि, जर तू माझे सत्य कोणाला सांगितले तर मी अन्विताला सगळं सांगेन पुराव्यानिशी. देवयानी आदित्याला असे देखील सांगते कि, ती आदित्याचा संसार मोडून टाकेल.

Web Title: 'Radha Prem Rangi Rangali' 'new turn to the series!