राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये प्रेमने राधाला दिली प्रेमाची कबुली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 16:31 IST2018-05-07T11:01:50+5:302018-05-07T16:31:50+5:30
कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये प्रेमला एक कटू सत्य कळलं ज्यामधून बाहेर पडण्यासाठी राधाने प्रेमला मदत केली. ...
.jpg)
राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये प्रेमने राधाला दिली प्रेमाची कबुली !
क र्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये प्रेमला एक कटू सत्य कळलं ज्यामधून बाहेर पडण्यासाठी राधाने प्रेमला मदत केली. माधुरीने राधाला तिला खूप भीती वाटत आहे कारण जेव्हा प्रेमला ही गोष्ट कळेल कि, तो आमचा मुलगा नसून आम्ही त्याला दत्तक घेतले आहे तेव्हा तो माझा आई म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. राधा याबतीत पुढाकार घेऊन माधुरीला मदत करण्याचा निर्णय घेते. यामुळेच राधा प्रेमला सत्य सांगते जे ऐकून प्रेम पूर्णपणे खचून जातो. इतक मोठं सत्य का माझ्यापासून लपवून ठेवले हे त्याला कळत नाही आणि तो घराबाहेर निघून जातो. हे सगळं राधाने खूप समंजसपणे हाताळलं, प्रेमला सांभाळून घेतलं. हे सगळं घडत असताना राधा प्रेमचा व्यवसाय देखील सांभाळण्यात त्याची मदत करते आहे. हे सगळं बघून प्रेमला आता कुठेतरी राधाबद्दल प्रेम वाटू लागले आहे, आणि याचीच कबुली त्याने राधाला दिली. इतके दिवस मनामध्ये काय होत आहे हे जरी तेव्हा कळाले नसले तरी तरीदेखील आता ते काय आहे हे प्रेमला उमगले असून त्याचे राधावर मनापासून प्रेम असल्याचे त्याने राधाला सांगितले आहे.
राधा आणि प्रेम चा आता नवा प्रवास सुरु झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु, प्रेमच्या या कबुलीवर राधाचे काय उत्तर असेल ? राधा तिच्या मनातील भावना प्रेमला सांगेल का ? कि, दीपिकाच्या आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी ती काहीच बोलणार नाही ? राधासुध्दा प्रेमाची कबुली देणार ? प्रेम – राधाचा नातं कुठल्या वळणावर येईल ? हे बघणे रंजक असणार आहे.
राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका सुरू झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यामुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. उत्कृष्ट अभिनय, आपल्या कुटुंबावर निस्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या राधाने आपल्या सोज्वळ स्वभाव आणि नाजूक बोलण्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच १३ वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सचित पाटील म्हणजेच प्रेम याचा सहज अभिनय, तो साकारत असलेला प्रेम, दीपिका म्हणजेच अर्चना निपाणकर हिचे खोचक बोलणारे, विश्वनाथचा तडफदार खेळ या सगळ्यालाच प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे