पुनीश शर्मा अन् बंदगी कालराने विरुष्काची केली नक्कल; यूजर्सनी म्हटले, ‘बनीश’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 20:45 IST2018-03-15T15:15:21+5:302018-03-15T20:45:30+5:30

पुनीश शर्मा आणि बंदगी कालराने विराट-अनुष्काची नक्कल करताना एक फोटो शेअर केला. यूजर्सनी त्यांच्या या फोटोला चांगलेच धारेवर धरले.

Punish Sharma and Bandi Kaleri make a replica of Viruska; Users said, 'Baneesh'! | पुनीश शर्मा अन् बंदगी कालराने विरुष्काची केली नक्कल; यूजर्सनी म्हटले, ‘बनीश’!

पुनीश शर्मा अन् बंदगी कालराने विरुष्काची केली नक्कल; यूजर्सनी म्हटले, ‘बनीश’!

िग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन ११ मध्ये सहभागी झालेले पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा शो संपल्यानंतरही सातत्याने चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांच्यातील रोमान्स चांगलाच बहरला होता. त्यांच्या रोमान्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. याचा फायदा त्यांना लोकप्रियतेसाठी झाला. कॉमनर म्हणून घरात सहभागी झालेला पुनीश शर्मा तर टॉप ४ पर्यंत पोहोचला होता. दरम्यान, बिग बॉसच्या घरात ज्या पद्धतीने दोघांमध्ये प्रेम बहरले होते, तसेच काहीसे ते आता बिग बॉसच्या घराबाहेरही बघावयास मिळत आहे. कारण अजूनही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात असून, त्यांच्यातील केमिस्ट्री दर्शविणारे बरेचसे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. नुकताच त्यांनी एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ते दोघे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची नक्कल करताना बघावयास मिळत आहेत. मात्र त्यांचा हा अंदाज चाहत्यांना फारसा पसंत आला नसल्याने त्यांना या फोटोवरून आता ट्रोल केले जात आहे. 

वास्तविक पुनीशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये बंदगी त्याच्या गालावर किस करताना बघावयास मिळत आहे. दोघांनी फोटोमध्ये ज्यापद्धतीने पोझ दिली आहे, अगदी तसाच फोटो काही काळापूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा समोर आला होता. ज्यामध्ये अनुष्का विराटच्या गालावर किस करताना दिसत आहे. त्यामुळे बंदगी-पुनीशने विराट आणि अनुष्काची फोटोमध्ये नक्कल केल्याचे लगेचच यूजर्सनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. एका यूजरने लिहिले की, ‘कृपा करून कॉपी करू नका, आपली स्टाइल बनवा’ तर अन्य एका यूजरने लिहिले की, ‘विराट आणि अनुष्का शर्माचे नाव मिळून विरुष्का असा शब्द होतो. मग या दोघांचे नाव ‘बनीश’ व्हायला हवे. 
 

पुनीशने शेअर केलेल्या या फोटोला यूजर्सकडून अशाप्रकारच्या प्रचंड कॉमेण्ट्स आल्या. वास्तविक काही यूजर्सनी चांगल्याही कॉमेण्ट दिल्या. काही यूजर्सनी या दोघांना विराट-अनुष्काच्या जोडीपेक्षाही चांगली जोडी म्हणून सांगितले. एका दिवसाच्या आता जवळपास ६० हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा फोटो लाइक केला. वास्तविक बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर दोघांमधील नाते संपुष्टात येईल, अशी चर्चा होती. परंतु दोघांमधील प्रेम कायम असून, आता त्याचे रूपांतर लग्नात होणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Punish Sharma and Bandi Kaleri make a replica of Viruska; Users said, 'Baneesh'!