प्रियदर्शिनी इंदलकर सिंगल की कमिटेड? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:31 IST2026-02-02T11:30:41+5:302026-02-02T11:31:26+5:30
प्रियदर्शिनीनं स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला

प्रियदर्शिनी इंदलकर सिंगल की कमिटेड? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीने आख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शनीनं अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं. सध्या प्रियदर्शनी इंदलकर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. चाहत्यांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या लग्नाच्या प्रश्नावर आता खुद्द प्रियदर्शिनीनेच खुलासा केला आहे. आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल तिनं चाहत्यांना सांगितलंय.
प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये गेलेली असताना प्रियदर्शिनीला तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने स्पष्टपणे 'मी सिंगल आहे' असे उत्तर दिले. इतकेच नाही तर, गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल २०२५ मध्ये तिचे ब्रेकअप झाल्याचेही तिने जाहीर केले.
रिलेशनशिप Toxic होतं का?
ब्रेकअपचे कारण सांगताना प्रियदर्शिनी म्हणाली, "आमच्यात 'Compatibility' नव्हती. तो किंवा मी वैयक्तिकरित्या Toxic नव्हतो, पण आमचे नाते मात्र Toxic झाले होते". तिने पुढे स्पष्ट केले की, ब्रेकअपचा निर्णय तिचा स्वतःचा होता. "तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता आणि त्याला लवकर लग्न करायचे होते. मला मात्र करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते, लग्नाची घाई नव्हती. यावरून आमच्यात वाद सुरू झाले आणि शेवटी आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला".