n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत शानची भूमिका साकारणारा करण व्ही. ग्रोव्हर प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. त्याने नुकताच एक चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे मुंबईबाहेर होणार असल्याने करणकडे ही मालिका सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. करणने मालिका सोडण्याचा त्याचा निर्णय प्रोडक्शन हाऊसला सांगितला असून या केवळ काही दिवसच तो आता या मालिकेचे चित्रीकरण करणार आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी तो मालिका सोडणार असल्याची चर्चा होती. पण त्यावेळी निर्मात्यांनी त्याच्याशी चर्चा करून त्याचा हा निर्णय बदलायला लावला होता. पण आता करण त्याच्या निर्णयावर ठाम आहे. या मालिकेत करणची जागा मोहित सेहगल घेणार असल्याची चर्चा आहे. बहू हमारी रजनि_कांत ही मालिका मागच्या वर्षी सुरू होणार होती. पण काही कारणास्तव ही मालिका सुरू व्हायला उशीर झाला. याचमुळे करणला मालिका आणि त्याच्या चित्रपटाच्या तारखा जुळवणे कठीण जात आहे. याचमुळे करण या मालिकेला रामराम ठोकला आहे.
Web Title: Priya preferred to Karan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.