प्रिया मराठेची मालिकेत होणार एंट्री, पाहायला मिळणार मॉडर्न अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 11:05 IST2021-01-04T11:05:29+5:302021-01-04T11:05:58+5:30

प्रिया मराठेने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'चार दिवस सासूचे' या मालिकेत तिने काम केलं. 'तू तिथे मी' या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली. याशिवाय 'कसम से' या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली. मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली. 

Priya Marathe's entry in the series will be seen, modern predictions will be seen | प्रिया मराठेची मालिकेत होणार एंट्री, पाहायला मिळणार मॉडर्न अंदाज

प्रिया मराठेची मालिकेत होणार एंट्री, पाहायला मिळणार मॉडर्न अंदाज

छोट्या पडद्यावरील 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण'  ही मालिका रसिकांच्या पुरेपूर पसंतीस उतरलीये. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना रसिकांनाही मजा येतेय त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. पाहता पाहता या मालिकेने ३५० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.

आता या मालिकेत एक नवीन व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, ती म्हणजे नचिकेतची आई इरा देशपांडे. हि व्यक्तिरेखा साकारण्यासाठी एका नवीन अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री होणार आहे. ती म्हणजे रसिकांचे लाडकी अभिनेत्री प्रिया मराठे. पुण्यात लहानाची मोठी झालेली इरा लग्न करून ऑस्ट्रेलियाला गेली आणि गेली २५ वर्ष ती तिकडेच राहतेय. 

नचिकेतवर १० लाखांचं कर्ज आहे त्यामुळे त्याला मदत करण्यासाठी ती इकडे आली आहे. ती विचाराने अगदी मॉडर्न आहे आणि भारतात अजूनही खूप लोक आहेत जे अजूनही उपडेट झालेले नाही, आहेत खूप जुन्या विचारांचे आहेत असं तिचं मत आहे. त्यामुळे नचिकेत जेव्हा एका भारतीय मुलीच्या प्रेमात पडला आहे हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

या नव्या भूमिकेबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, "ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत एक वेगळी भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. मी या आधी कधीच NRI ची भूमिका निभावली नव्हती त्यामुळे मी खूप एन्जॉय करतेय आणि रसिकांना देखील माझी हि नवीन भूमिका बघायला नक्की आवडेल अशी मी आशा करते."


प्रिया मराठेने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'चार दिवस सासूचे' या मालिकेत तिने काम केलं. 'तू तिथे मी' या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली. याशिवाय 'कसम से' या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली. मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली. 

'बडे अच्छे लगते है', 'कॉमेडी सर्कस'मध्येही प्रिया झळकली. गेल्या वर्षी तिने 'साथ निभाना साथियाँ' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती. नवीन भूमिकेच्या माध्यमातून ती रसिकांच्या भेटीला येणार असल्यामुळे प्रियाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 

Web Title: Priya Marathe's entry in the series will be seen, modern predictions will be seen