प्रायव्हेट फोटो झाले होते लीक, लोकांनी काढले होते स्क्रीनशॉट, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 17:33 IST2024-08-08T17:33:05+5:302024-08-08T17:33:39+5:30

या अभिनेत्रीने एका मुलाखतीत नुकतेच स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Private photos were leaked, screenshots were taken by people, shocking revelation of the famous actress | प्रायव्हेट फोटो झाले होते लीक, लोकांनी काढले होते स्क्रीनशॉट, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

प्रायव्हेट फोटो झाले होते लीक, लोकांनी काढले होते स्क्रीनशॉट, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सोशल मीडिया इन्फ्लुंसर उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अभिनेत्री दररोज तिच्या फॅशनवर प्रयोग करत असते, त्यामुळे ती ट्रोलही होते. उर्फी जावेद तिच्या असामान्य लुक्स आणि अनोख्या फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. शैलीच्या बाबतीतही उर्फी सर्वोत्कृष्ट आहे यात शंका नाही. उर्फी केवळ तिच्या फॅशनसाठीच नाही तर स्पष्ट बोलण्यासाठीही ओळखली जाते.

नुकताच उर्फी जावेदने स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. उर्फीचे हे वक्तव्य ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. होय, उर्फी जावेदने पॉडकास्टमध्ये साक्षी शिवदासानी आणि नैना भान यांच्यासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी बोलल्या. पण यावेळी तिने एका घटनेबद्दल सांगितले ज्याने सगळेच थक्क झाले. उर्फीने सांगितले की, याआधी ती याबद्दल कोणाशीही फारशी बोललेली नव्हती. कोविड महामारीनंतर लगेचच ही घटना घडली.

कोणीतरी माझे स्नॅपचॅट हॅक केले आणि...

उर्फी जावेदने सांगितले की, त्यावेळी कोणीतरी माझे स्नॅपचॅट हॅक केले होते. त्यामुळे माझे सर्व फोटो मेमरीमध्ये सेव्ह झाले, ही माझी चूक होती. कारण मी डबल ऑथेंटिकेशन केले नाही. यामुळे माझे सर्व खाजगी फोटो लीक झाले होते. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, यानंतर, स्नॅपचॅटवर, कोणीतरी माझे खाजगी फोटो स्टोरीवर पोस्ट केले होते, परंतु मला कळताच मी ते त्वरित हटवले. पण तोपर्यंत अनेकांनी त्या स्टोरीचे स्क्रीनशॉट घेतले होते. माझे खाजगी फोटोही व्हायरल झाले होते.


उर्फी जावेदचे नाव अशा अभिनेत्रींमध्ये येते जे त्यांच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असतात. बॉलिवूड किंवा टीव्ही इंडस्ट्रीत जेव्हा जेव्हा असामान्य फॅशनची चर्चा होते तेव्हा उर्फीचे नाव नक्कीच घेतले जाते. उर्फी तिच्या खास फॅशन सेन्समुळे दररोज चर्चेत असते. अनेकवेळा तिची स्टाईल ट्रोल होताना दिसते.

Web Title: Private photos were leaked, screenshots were taken by people, shocking revelation of the famous actress