"या माणसाला खूप प्रेम, तू संयम, समर्पण, निष्ठा..." विराटसाठी पृथ्वीक प्रतापची खास पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 09:01 IST2025-06-04T08:54:15+5:302025-06-04T09:01:17+5:30

RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी अनेक बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत.

Prithvik Pratap Shares Post For Virat Kohli Rcb Winning Ipl 2025 | "या माणसाला खूप प्रेम, तू संयम, समर्पण, निष्ठा..." विराटसाठी पृथ्वीक प्रतापची खास पोस्ट!

"या माणसाला खूप प्रेम, तू संयम, समर्पण, निष्ठा..." विराटसाठी पृथ्वीक प्रतापची खास पोस्ट!

 Prithvik Pratap Shares Post For Virat Kohli: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेरीस १८ वर्षांनी इंडियन प्रीमियर लीगचे जेतेपद (Rcb Ipl 2025) पटकावले आहे. पंजाबचा संघ अहमदाबादच्या मैदानावर १९१ धावांचं लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. आयपीएल जेतेपदासह आरसीबीचा १८ वर्षांचा दुष्काळही संपला आहे. विजयानंतर विराट कोहली (Virat Kohli) भावुक झाला.  अखेरचा चेंडू झाल्यानंतर विराट लहान मुलांसारखा गुडघ्यावर बसला आणि मैदानावर डोकं टेकवून रडू लागला.  RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी अनेक बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापनंदेखील ( Prithvik Pratap) विराटसाठी खास पोस्ट केली. विराटसाठी त्यानं लिहलं, "या माणसाला खूप प्रेम…#kohlipaglu…विराट तू मला संयम, समर्पण, निष्ठा, आवड आणि स्वत:वर भरपूर विश्वास ठेवायला शिकवलंस…धन्यवाद कोहली".  पृथ्वीक प्रतापच्या विराटच्या चाहत्यांनी कमेंट करत क्रिकेटपटूबद्दलचं प्रेम व्यक्त केलंय. 


दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावत १९० धावा केल्या होत्या. बंगळुरूने पंजाबसमोर १९१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पंजाब किंग्सला विजयासाठी अखेरच्या षटकात २९ धावांची गरज होती. शशांक सिंग मैदानात फलंदाजी करत कायम होता. जॉश हेझलवूडने अखेरचं षटक टाकलं. या अखेरच्या षटकात पहिले दोन चेंडू डॉट बॉल गेल्याने धावांचा फरक वाढला. नंतर शशांकने ३ षटकार आणि चौकार लगावला पण सामना हाताबाहेर गेला होता आणि अखेरीस आरसीबीने विजय मिळवला.

Web Title: Prithvik Pratap Shares Post For Virat Kohli Rcb Winning Ipl 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.