दिल है हिंदुस्तानी २ च्या विजेत्याला प्रितम देणार ही खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 15:12 IST2018-09-18T15:11:28+5:302018-09-18T15:12:41+5:30

प्रितम सध्या स्टार प्लसवरील दिल है हिंदुस्तानी २ मध्ये बादशाह आणि सुनिधी चौहानसोबत परीक्षक म्हणून काम करत आहे.  त्याने दिल है हिंदुस्तानी २ च्या विजेत्यासाठी एक छोटीशी भेट दिली आहे.

Pritam will give entry to dil hai hindustani 2 in JAM8 | दिल है हिंदुस्तानी २ च्या विजेत्याला प्रितम देणार ही खास भेट

दिल है हिंदुस्तानी २ च्या विजेत्याला प्रितम देणार ही खास भेट

प्रितमने आजवर बर्फी, ऐ दिल है मुश्कील, जग्गा जासूस, धूम, रेस, लव्ह आज कल, अजब प्रेम की गजब कहाणी, कॉकटेल, लाइफ इन मेट्रो यांसारख्या चित्रपटांना खूप चांगले संगीत दिले आहे. आज बॉलिवूडमधील यशस्वी संगीतकारांमध्ये त्याची गणना केली जाते. प्रितमने काही वर्षांपूर्वी जॅम८ या म्युझिकल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली होती. हा प्लॅटफॉर्म नवीन कलाकारांना संधी देतो.

प्रितम सध्या स्टार प्लसवरील दिल है हिंदुस्तानी २ मध्ये बादशाह आणि सुनिधी चौहानसोबत परीक्षक म्हणून काम करत आहे.  त्याने दिल है हिंदुस्तानी २ च्या विजेत्यासाठी एक छोटीशी भेट दिली आहे. या कार्यक्रमाच्या विजेत्याला जॅम ८ सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅटफॉर्मद्वारे विजेत्याला प्रितमचे मार्गदर्शन मिळणार आहे. याविषयी प्रितम सांगतो, “दिल है हिंदुस्तानी २ चे परीक्षण करण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद होत आहे. या स्पर्धेतील स्पर्धक खूप गुणी असून त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे या शोमधील विजेत्याला मी एक मोठी संधी देण्याचे ठरवले आहे. त्याला किंवा तिला माझ्या कंपनीसोबत भारतीय संगीत क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल आणि मी स्वतः त्याच्याकडे जातीने लक्ष देईन. जॅम ८ मधून आम्ही नवीन कलाकारांना या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी देतो. त्यामुळे या कार्यक्रमाचा विजेता कोण बनेल याबद्दल सर्वांसोबत मलाही खूप उत्सुकता लागली आहे.”

स्टार प्लसवरील दिल है हिंदुस्तानी २ मधून जगभरातील मनाने हिंदुस्तानी असलेले गायक एकत्र आले आहेत. यात लोकप्रिय भारतीय गीतांवरील एक से एक परफॉर्मन्सेस रसिकांना पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक गीताला स्पर्धक आपली अशी खास शैली प्रदान करतात आणि त्यामुळे पारंपारिक आणि आधुनिक संगीताचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतोय. या शोमध्ये प्रत्येक भागात इंडस्ट्रीतील मोठमोठे कलाकार येत असून ते स्पर्धकांसोबत गातात. तसेच त्यांना मार्गदर्शन देखील करतात.

Web Title: Pritam will give entry to dil hai hindustani 2 in JAM8

टॅग्स :Pritamप्रीतम