प्रिन्स नरुला रमला बिग बॉसच्या आठवणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2017 16:26 IST2017-01-26T10:56:23+5:302017-01-26T16:26:23+5:30

बिग बॉस या कार्यक्रमामुळे आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या करिअरला वळण मिळालेले आहे. राखी सावंत, राहुल महाजन, डॉली बिंद्रा ही नावे ...

Prince Nuru Rumla remembers Bigg Boss | प्रिन्स नरुला रमला बिग बॉसच्या आठवणीत

प्रिन्स नरुला रमला बिग बॉसच्या आठवणीत

ग बॉस या कार्यक्रमामुळे आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या करिअरला वळण मिळालेले आहे. राखी सावंत, राहुल महाजन, डॉली बिंद्रा ही नावे तर बिग बॉसमुळेच चर्चेत आली. त्यामुळे या घरात हजेरी लावणाऱ्यांसाठी बिग बॉस ही मालिका खूप महत्त्वाची असते.
बिग बॉसचे विजेतेपद मिळणाऱ्याला तर या कार्यक्रमामुळे प्रसिद्धी मिळण्यासोबतच एक मोठी रक्कम देखील मिळते. त्यामुळे या विजेत्यांसाठी तर हा कार्यक्रम खूप खास असतो. त्यामुळे प्रिन्स नरुलासाठी हा कार्यक्रम खूप खास आहे. 
प्रिन्स नरुलाने बिग बॉस ९ चे विजेतेपद मिळवले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या ट्रॉफीचा तो प्रबळ दावेदार मानला जात होता. या कार्यक्रमाच्या फिनालेचा एक व्हिडिओ त्याने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रिन्सला बिग बॉसचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले तो क्षण आहे. 
प्रिन्स नरुलाने या व्हिडिओच्या खाली एक पोस्ट लिहून त्याच्या फॅन्सचे आभार मानले आहेत त्याने म्हटले आहे की हा विजय तुमच्या शिवाय शक्य नव्हता.
मला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी मी तुमचा आभारी आहे. बिग बॉसचे विजेतेपद मिळाले, तो माझ्यासाठी आणि माझ्या कुटूंबियासाठी सगळ्यात चांगला दिवस होता. मी यासाठी बिग बॉस या कार्यक्रमाचा आयुष्यभर ऋणी राहीन.
बिग बॉस नंतर आता प्रिन्स नरुला बढो बहू या मालिकेत एका रेसलरची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

Web Title: Prince Nuru Rumla remembers Bigg Boss