'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर बंगळुरूच्या आश्रमात गेली तेजश्री, शेअर केले फोटो, म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:18 IST2025-01-20T14:16:01+5:302025-01-20T14:18:33+5:30
तेजश्रीने अचानक मालिका सोडल्यानंतर चाहतेही नाराज झाले होते. मालिका सोडल्यानंतर आता तेजश्री बंगळुरूला गेली आहे.

'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर बंगळुरूच्या आश्रमात गेली तेजश्री, शेअर केले फोटो, म्हणते...
तेजश्री प्रधान हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. नुकतंच तेजश्रीने प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतली. या मालिकेत ती मुक्ता ही भूमिका साकारत होती. तेजश्रीने अचानक मालिका सोडल्यानंतर चाहतेही नाराज झाले होते. मालिका सोडल्यानंतर आता तेजश्री बंगळुरूला गेली आहे.
बंगळुरूच्या 'Art of living' या आश्रमात सध्या तेजश्री तिचा वेळ घालवत आहे. मैत्रिणीसोबत तेजश्री या आश्रमात गेली आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. या आश्रमातील वासराबरोबरचा एक गोड फोटो तिने शेअर केला आहे. "आम्ही सेम चेहरे करत आहोत...आणि ह्यांच्या डोळ्यांचं काय करायचं किती तो Innocence", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, तेजश्रीने मालिका का सोडली, याबाबत अद्याप तिने काही सांगितलेलं नाही. प्रेमाची गोष्ट मालिकेत आता नवीन मुक्ताची एन्ट्री झाली आहे. आता मालिकेत मुक्ताची भूमिका स्वरदा
ठिगळे साकारताना दिसणार आहे.