प्रेग्नेंट अनिता हसनंदानीने शकीराच्या गाण्यावर केला डान्स, फॅन्स म्हणाले- ”मत करो ये सब”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 15:56 IST2021-01-08T15:51:22+5:302021-01-08T15:56:48+5:30

प्रेग्नेन्सीमुळे अनिताच्या चेह-यावर ग्लो आल्याचे पाहायला मिळतंय.

Pregnant anita hasanandani danced to shakira songs | प्रेग्नेंट अनिता हसनंदानीने शकीराच्या गाण्यावर केला डान्स, फॅन्स म्हणाले- ”मत करो ये सब”

प्रेग्नेंट अनिता हसनंदानीने शकीराच्या गाण्यावर केला डान्स, फॅन्स म्हणाले- ”मत करो ये सब”

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. सध्या ती तिची प्रेग्नेंन्सी एन्जॉय करते आहे. अनिता अनेकदा तिचा नवरा रोहित रेड्डीसोबत मजेदार व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच अनिताने बेबी बेम्पीसह डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती शकीराच्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अनिता हसनंदानीने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'एकदा जो शकीराचा फॅन होता तो कायमचा तिचा फॅन होता.' अनिताचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतो आहे. तर काही फॅन्सनी काळजी व्यक्त केली आहे. अनिताचे चाहते म्हणतात की सध्या स्वत: ची काळजी घ्यावी आणि असे काहीही करु नये ज्यामुळे तिला आणि बाळाला त्रास होईल. 

प्रेग्नंसीमुळे अनिताच्या चेह-यावर ग्लो आल्याचे पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच एकता कपूरने अनितासाठी स्वत:च्या घरी  छोट्याशा पार्टीचे आयोजन केलं होतं. 

अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी २०१३ साली रेशीमगाठीत अडकले होते. दोघांचा प्रेमविवाह होता.अनिता आणि रोहित रेड्डी दोघांची पहिली भेट जीममध्ये झाली होती. दोघेही एकाच जिममध्ये वर्कआउसाठी जायचे. दोघांची मैत्री झाली आणि दोघे एकत्र पब पार्ट्यामध्ये जाऊ लागले. रोहित रेड्डी हा एक व्यावसायिक आहे. अनिता आणि रोहितची जोडी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक क्युट जोडी मानली जाते.
 

Web Title: Pregnant anita hasanandani danced to shakira songs