Pratyusha Banerjee: “प्रत्युषाने आत्महत्या केली नव्हतीच...”, घटनेच्या ७ वर्षानंतर एक्स-बाॅयफ्रेन्ड राहुलचा शॉकिंग दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:20 PM2023-04-10T17:20:42+5:302023-04-10T17:24:06+5:30

Pratyusha Banerjee : प्रत्युषा प्रकरणी राहुल तीन महिने तुरूंगात होता. आता प्रत्युषाच्या निधनाच्या ७ वर्षानंतर राहुल राजने एक खळबळजनक दावा केला आहे.

Pratyusha Banerjee Ex Boyfriend Rahul Raj Claimed That Actress Did Not Do Suicide | Pratyusha Banerjee: “प्रत्युषाने आत्महत्या केली नव्हतीच...”, घटनेच्या ७ वर्षानंतर एक्स-बाॅयफ्रेन्ड राहुलचा शॉकिंग दावा

Pratyusha Banerjee: “प्रत्युषाने आत्महत्या केली नव्हतीच...”, घटनेच्या ७ वर्षानंतर एक्स-बाॅयफ्रेन्ड राहुलचा शॉकिंग दावा

googlenewsNext

Pratyusha Banerjee: टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आज आपल्यात नाही. १ एप्रिल २०१६ ला प्रत्युषाने गळफास लावत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येने अख्खी टीव्ही इंडस्ट्री हादरली होती. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा लिव्ह इन पार्टनर आणि एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंगला अटक करण्यात आली होती. राहुल राजनेच प्रत्युषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं, असा आरोप ठेवण्यात आला होता. याप्रकरणी राहुल तीन महिने तुरूंगात होता. आता प्रत्युषाच्या निधनाच्या ७ वर्षानंतर राहुल राजने एक खळबळजनक दावा केला आहे.
प्रत्युषाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी तिने व राहुल राज दोघांनी पार्टी एन्जॉय केली होती. मग असं काय झालं की प्रत्युषाने आत्महत्या केली, असा प्रश्न आजतकच्या मुलाखतीत राहुल राजला विचारण्यात आला. यावर, ती आत्महत्या होती, हे मी मान्यच करू शकत नाही, असं तो म्हणाला.

काय म्हणाला राहुल राज?
''मी त्याला आत्महत्या म्हणणार नाही. त्यादिवशी प्रत्युषा मला घाबरवण्यासाठी फक्त गळफास घेतल्याचा खोटा खोटा व्हिडीओ बनवत होती. ती अनेकदा असं करायची. त्या दरम्यान तिचा पाय सटकला असेल आणि तिला बॅलन्स बिघडला असेल, ज्यामुळे ती घटना घडली असावी,'', असं तो म्हणाला. ज्या दिवशी ती घटना घडली, त्या दिवसापासून दोन तीन दिवस मी माझ्यात नव्हतो. झोपेच्या गोळ्याही काम करत नव्हत्या. डॉक्टर इंजेक्शन देऊन झोपवण्याचा प्रयत्न करत होते. मी बोलायच्या स्थितीतच नव्हतो. ती आता नाहीये, याची जाणीव झाली आणि लगेच तिच्या मृत्यूसाठी मला जबाबदार ठरवलं गेलं. मी तिच्या मृत्यूला कसा कारणीभूत असू शकतो. एका रात्रीआधीच आम्ही पार्टी केली होती. मी तिला तिच्या कुटुंबाविरोधात कधीच भडकवलं नाही. ती स्वत:च तिच्या आईवडिलांच्या कर्जामुळे त्रासली होती. तिच्याकडे पैसे यायचे आणि ते कुटुंबाच्या कर्जाचे हफ्ते भरण्यात जायचे. ती चिडायची. मी तिला समजवायचो, असंही त्याने सांगितलं.


 
माझं करिअर बर्बाद झालं...?
राहुल राजने आज तकला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी शेअर केल्या. तो म्हणाला,''प्रत्युषाच्या मृत्यूनंतर माझं आयुष्यच बदलून गेलंय. करिअर तर संपलंच, पण पर्सनल लाईफही डिस्टर्ब झालं. जगण्याची आशाच संपली होती. जेव्हा त्यातून बाहेर आलो तेव्हा कामाबद्दल विचार केला. पण कामही मिळत नव्हतं. जे काल मित्र होते, त्यांनी दूर सारलं. अनेक प्रोजेक्टमधून मला बाहेर काढलं गेलं. अनेकांनी मला काम मिळू नये म्हणून प्रयत्न केलेत. मी खूप स्ट्रगल केला. आता कुठे मला हा अल्बम मिळाला आहे. मला 'लॉकअप १' ऑफर झाला होता,पण विकास गुप्तानं माझा पत्ता कट केला. विकास गुप्तामुळे माझ्या हातातून शो गेला, असंही तो म्हणाला.

Web Title: Pratyusha Banerjee Ex Boyfriend Rahul Raj Claimed That Actress Did Not Do Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.