'तुझ्या इश्काचा नादखुळा' मालिकेत रघू आणि स्वातीच्या आयुष्यात येणार माया नावाचं वादळ,प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 12:24 IST2021-06-11T12:18:40+5:302021-06-11T12:24:22+5:30

तुझ्या इश्काचा नादखुळा ही मालिका अतिशय नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे. अभिनेत्री प्रतीक्षा जाधव माया ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 

Pratiksha Jadhav's New Entry In Marathi Serial Tuzya Ishkacha Nadkhula Will Play The Role Of Maya | 'तुझ्या इश्काचा नादखुळा' मालिकेत रघू आणि स्वातीच्या आयुष्यात येणार माया नावाचं वादळ,प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री

'तुझ्या इश्काचा नादखुळा' मालिकेत रघू आणि स्वातीच्या आयुष्यात येणार माया नावाचं वादळ,प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री

स्टार प्रवाहवरील तुझ्या इश्काचा नादखुळा मालिका  दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. या मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांची मने जिंकली. मग ती कथा असो, रिअल लोकेशन्स असो वा मालिकेतील पात्र असो. अनेक ट्विस्ट्स आणि टर्न्स प्रेक्षकांनी मालिकेमध्ये पाहिले आहेत. त्यामुळे मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते. 

आता पुन्हा एकदा आगामी भागात रसिकांना धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रघु आणि स्वातीच्या आयुष्यात माया नावाचं वादळ येणार आहे. खरतर रघु आणि स्वातीचं नातं आता कुठे खुलायला लागलं होतं. मात्र माया या पात्रामुळे 'तुझ्या इश्काचा नादखुळा' ही मालिका अतिशय नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे. अभिनेत्री प्रतीक्षा जाधव माया ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 

प्रतीक्षाला याआधी बऱ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे. स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण आणि मोलकरीण बाई या मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली आहे. तिने साकारलेल्या मालिकेतल्या भूमिकांनाही रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे या मालिकेत तिची एंट्रीही खास असणार आहे. तिच्या येण्याने मालिकेला रंजक वळण मिळणार आहे. 

खरंतर माया तिच्या नावा सारखीच मायावी आहे. स्वतःचा खरा चेहेरा समोरच्याला कधीही कळू न देण्यात सराईत. कुलकर्णी कुटुंबात येण्यामागे मायाचं नेमकं कोणतं षडयंत्र आहे? मायाच्या एण्ट्रीने रघू आणि स्वातीच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालथ होणार आहे हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. 

Web Title: Pratiksha Jadhav's New Entry In Marathi Serial Tuzya Ishkacha Nadkhula Will Play The Role Of Maya