प्रशांत दामले नवीन भूमिकेत, या कार्यक्रमातून रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 15:34 IST2021-11-29T15:29:01+5:302021-11-29T15:34:23+5:30

'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा प्रोमो नुकतंच वाहिनीवर सादर झाला.

Prashant Damle to Judge New Show 'Kitchen Kallakar'; details inside | प्रशांत दामले नवीन भूमिकेत, या कार्यक्रमातून रसिकांच्या भेटीला

प्रशांत दामले नवीन भूमिकेत, या कार्यक्रमातून रसिकांच्या भेटीला

'खवय्ये' म्हंटल्यावर एक चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अभिनेता प्रशांत दामले यांचा. प्रशांत दामले हे एक खवय्या सुद्धा आहेत आणि त्यांची हीच खवय्येगिरी आता प्रेक्षक पाहू शकतील  छोट्या पडद्यावर आगामी कार्यक्रम 'किचन कल्लाकार'मध्ये.  'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा प्रोमो नुकतंच वाहिनीवर सादर झाला. यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की,आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचन मध्ये कस लागणार आहे. 

आता के कलाकार 'किचन'मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. यामध्ये अभिनेता प्रशांत दामले यांची काय भूमिका आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर या कार्यक्रमात प्रशांत दामले हे जजची भूमिका निभावणार आहेत. कुठले कलाकार पाककलेचे शिवधनुष्य पेलवू शकले याचा अंतिम निर्णय हा प्रशांत दामले घेणार आहेत. त्यामुळे कलाकारांना आता खवय्या प्रशांत दामले यांना आपल्या पाक-कौशल्याने प्रभावित करणं किती कठीण जाणार जाणार आहे हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.          


पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचनमध्ये कस लागणार आहे. आता के कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. हा कुकींगशी संबंधीत शो पाहण्यासाठी सर्वंजण उत्सुक आहेत. या शोची रचना काय आहे अजून या शो मध्ये कोण असणार याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रशांत दामले यांना या कार्यक्रमाच्या जजच्याभूमिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Prashant Damle to Judge New Show 'Kitchen Kallakar'; details inside