'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमुळे प्रार्थना बेहरेचं मोठं स्वप्न झालं पूर्ण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:00 IST2021-08-24T19:00:00+5:302021-08-24T19:00:00+5:30

प्रार्थना बेहरेने सांगितले की, गेली अनेक वर्षापासून खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. आपले चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. म्हणून मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचा निर्णय घेतला आणि हि मालिका स्वीकारली.

Prarthana Behere Reveals her dream came true from serial Majhi Tujhi Reshmigath, check here | 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमुळे प्रार्थना बेहरेचं मोठं स्वप्न झालं पूर्ण, जाणून घ्या

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमुळे प्रार्थना बेहरेचं मोठं स्वप्न झालं पूर्ण, जाणून घ्या

प्रार्थना बेहरेने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. प्रार्थनाच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्रार्थना रसिकांची आवडती अभिनेत्री बनली आहे.

 

 

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हॉट्स अॅप लग्न अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. मालिकांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. आजवर प्रार्थनाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. 

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रोमोज रिलीज झाल्यापासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा ही चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. या मालिकेतून प्रार्थनाने मराठी टेलिव्हिजन माध्यमात पदार्पण केलं आहे. 

प्रार्थना बेहरेने सांगितले की, गेली अनेक वर्षापासून खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. आपले चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. म्हणून मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचा निर्णय घेतला आणि हि मालिका स्वीकारली. मालिकेत नेहा कामत हि व्यक्तिरेखा या मालिकेत साकारतेय. 


नेहा हि खूप साधी-सरळ आहे. ती आणि तिची मुलगी परी यांचं एक छोटंसं जग आहे आणि या त्यांच्या जगात जेव्हा यशवर्धनची एंट्री होते तेव्हा त्यात काय भावनिक बदल होतो हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.मालिकेतल्या मायराने मालिकेत झळकण्यापूर्वीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

मायरा खूपच लहान आहे आणि तितकीच निरागस आहे. ती फारच गोड आणि बिनधास्त आहे, तिला कसलीच भीती वाटत नाही आणि कॅमेराची तर मुळीच नाही. ती तिला दिलेले डायलॉग्स एकदम चोख बोलते आणि खूप छान परफॉर्म करते. ऍक्टिंग न करता ऍक्टिंग कशी करावी हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे.  

श्रेयस सारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याचं माझं स्वप्न होतं. त्यांच्यासोबत चित्रपटात भूमिका मिळावी अशी माझी आंतरिक इच्छा होती. पण मालिकेत सहकलाकार आणि त्यातही प्रेमाच्या संवेदनशील गोष्टीवर हि मालिका आहे त्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाल्याचे प्रार्थनाने सांगितले.

Web Title: Prarthana Behere Reveals her dream came true from serial Majhi Tujhi Reshmigath, check here