Bigg Boss 19 नंतर आता पुढे काय? प्रणित मोरेला पूर्ण करायचंय 'हे' मोठं स्वप्न, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:31 IST2025-12-23T13:29:31+5:302025-12-23T13:31:00+5:30
'बिग बॉस' फेम प्रणित मोरेने व्यक्त केली 'ती' मोठी इच्छा

Bigg Boss 19 नंतर आता पुढे काय? प्रणित मोरेला पूर्ण करायचंय 'हे' मोठं स्वप्न, म्हणाला...
Pranit More Bucket List :'बिग बॉस' हिंदीचं १९ वं पर्व काही दिवसांपूर्वींचं संपलं. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता गौरव खन्नानं यंदाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तर फरहाना भट्ट या सीझनची उपविजेती ठरली. त्यात 'महाराष्ट्रीयन भाऊ' प्रणित मोरेला 'टॉप ३'वर समाधान मानावं लागलं. जरी प्रणितनं ट्रॉफी उचलली नाही, तरी त्याला महाराष्ट्रातून खूप प्रेम मिळालं. आता बिग बॉसनंतर प्रणित मोरेच्या प्लॅन्सबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अशातच प्रणितने त्याच्या 'बकेट लिस्ट'मधील एका खास स्वप्नाचा खुलासा केला आहे.
अलिकडेच 'बिग बॉस' फेम प्रणित मोरेने 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. यावेळी त्याने वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. या मुलाखतीत प्रणितला त्याच्या बकेट लिस्टमधील इच्छा विचारण्यात आल्या. यावेळी प्रणित म्हणाला, "मी अजून काही विचार केलेला नाही. पण मराठी स्टँडअपला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचा माझा विचार आहे".
पुढे तो म्हणाला,"मी एक महाराष्ट्र दौरा केला. मुंबईत डोम थिएटर आहे, ज्याची प्रेक्षक क्षमता २५ हजार आहे. खूप कमी कॉमेडियन्सनी तिथे परफॉर्म केलं आहे. कारण, त्या थिएटरच्या तिकीटपण विकल्या गेल्या पाहिजेत. तर माझी अशी इच्छा आहे की, मी तिकडे मराठी स्टँडअपचा शो करावा आणि त्या शोच्या सगळ्या तिकिटी विकल्या जाव्यात".