जिममध्ये कशाला हवेत वेगळे कपडे, साडी माझी भारी...! प्राजक्ता गायकवाडचा अनोखा वर्कआऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 12:22 IST2020-12-15T12:19:24+5:302020-12-15T12:22:14+5:30

तुमच्या  मयार्दांना पार करुन पुढे जा..., असा सुंदर मॅसेज देत प्राजक्ताने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

prajkta gaikwad workout in saree video viral | जिममध्ये कशाला हवेत वेगळे कपडे, साडी माझी भारी...! प्राजक्ता गायकवाडचा अनोखा वर्कआऊट!

जिममध्ये कशाला हवेत वेगळे कपडे, साडी माझी भारी...! प्राजक्ता गायकवाडचा अनोखा वर्कआऊट!

ठळक मुद्दे‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आली होती.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड जिथे जाईल तिथे चर्चा होणार. होय, प्राजक्ता नेहमी चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात प्राजक्ता काय करतेय, तर साडी नेसून वर्कआऊट करतेय. होय, साडी, नाकात नथ, केसांडा आंबाडा अशा थाटात प्राजक्ता जिममध्ये वर्कआऊट करतेय. तिने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे.  
इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्राजक्ता पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. नथ, आंबाडा असा मराठमोळा साजश्रृंगार करून  ती जिममध्ये वर्कआऊट करतेय. आता साडीत वर्कआऊट म्हटल्यावर चाहते फिदा होणारच.  नव्याको-या जिमच्या उद्घाटनासाठी अलीकडे प्राजक्ताला निमंत्रण मिळाले. अन् प्राजक्ताने या इव्हेंटसाठी कॅज्युअल कपड्यांऐवजी साडीची निवड केली.

उद्घाटन झाले आणि मग प्राजक्ताने स्वत: जिममध्ये वर्कआऊटचा शुभारंभ केला. ‘तुमच्या  मयार्दांना पार करुन पुढे जा...’, असा सुंदर मॅसेज देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आली होती. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून ती अचानक बाहेर पडली होती. तिने अचानक मालिका का सोडली, याबाबत चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर ती आणि या मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांच्यात झालेल्या वादामुळे पुन्हा ती चर्चेत आली होती.  नुकतेच प्राजक्ताने जेजुरीला खंडेरायाचे दर्शन घेतले होते आणि त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
  खंडेरायाची 42 किलो वजनाची खंडा तलवार प्राजक्ताने उचलली होती.   तिच्या या फोटोची खूप चर्चा होत झाली होती.

चार महिने शूटींग केले, दमडीही दिली नाही...! अलका कुबल यांच्या आरोपांना प्राजक्ता गायकवाडने दिले उत्तर

Web Title: prajkta gaikwad workout in saree video viral