दणक्यात सुरूये प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची तयारी, मामा-मामींनी केलं लाडक्या भाचीचं केळवण
By कोमल खांबे | Updated: October 17, 2025 11:13 IST2025-10-17T11:13:30+5:302025-10-17T11:13:49+5:30
प्राजक्ताच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. मोठ्या दणक्यात प्राजक्ताचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. यासाठी तिचे कुटुंबीयही उत्सुक आहेत. सध्या प्राजक्ताच्या केळवणाचा कार्यक्रम सुरू आहे.

दणक्यात सुरूये प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची तयारी, मामा-मामींनी केलं लाडक्या भाचीचं केळवण
मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा साखरपुडा झाला. आता डिसेंबर महिन्यात ती शंभुराज खुटवड यांच्यासह सप्तपदी घेणार आहे. प्राजक्ताच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. मोठ्या दणक्यात प्राजक्ताचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. यासाठी तिचे कुटुंबीयही उत्सुक आहेत. सध्या प्राजक्ताच्या केळवणाचा कार्यक्रम सुरू आहे.
प्राजक्ताच्या मामा-मामींनी लाडक्या भाचीचं केळवण केलं. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. प्राजक्ताच्या केळवणासाठी खास सजावटही केली होती. रांगोळी आणि फुलांनी मामा-मामींनी त्याचं घर सजवलं होतं. तर प्राजक्ताचं स्वागतही मोठ्या उत्साहात केलं. लाडक्या भाचीच्या केळवणासाठी पंचपक्वानांचा थाटही घातला गेला होता. "मामा- मामींच केळवण", असं म्हणत प्राजक्ताने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये ती दिसली होती. ७ ऑगस्टला प्राजक्ताचा साखरपुडा पार पडला. तिने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. प्राजक्ता आणि शंभुराज यांचा लग्नसोहळा येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.२४ वाजता हा लग्नसोहळा संपन्न होणार आहे.